शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
3
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
4
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
5
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
6
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
7
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
8
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
9
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
10
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
11
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
12
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
13
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
14
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
15
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
16
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
17
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
18
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

इतिहासाची मढी उकरण्यासाठी वर्तमान का खर्ची घालायचा ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 08:34 IST

इतिहासातील उणीदुणी काढण्याऐवजी वर्तमानात अनेक उणिवा आहेत, त्यांची धुणी धुतली जाणे अधिक महत्त्वाचे आहे. 

बाळकृष्ण शिंदे, पुणे

‘तुमच्या चुकांसाठी नेहरूंना जबाबदार कसे धरता?  केवळ बिर्याणी खाल्ल्याने संबंध सुधारत नाहीत’, अशा शेलक्या शब्दांत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी  घाणाघात केला, हे उत्तमच झाले. आजकाल नैमित्तिक कारणे शोधून नेहरूंना दोषी ठरवण्याची जणू ‘फॅशन’च झाली आहे. भारताला औद्योगिक आणि वैज्ञानिक मार्गाने नेणारे नेहरू व्हॉटस्ॲपच्या आजच्या युगात वेगळे भासवले जातात, त्यांचे हेतुपूर्वक  प्रतिमा भंजन केले जाते, ते टीकाविषय होतात. नेहरूंच्याच ‘अमन- शांती’मय मखमली हाताखाली सरदारांनी देशात पोलादी कार्य करून दाखवले होते. सर्व जगाचा विरोध डावलून नेहरूंनी भाभा अणू संशोधन केंद्राची स्थापना केली. म्हणूनच आज आपण अणुशस्त्र सज्ज होऊ शकलो आहोत. आयआयटी आणि आयआयएम यांसारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्थांची पायाभरणी केली आणि यातूनच आपण आज संगणक क्षेत्रात पुढे जाऊ शकलो आहोत. याहूनही महत्त्वाचे म्हणजे नेहरूंनीच लोकशाहीसाठी आवश्यक अशा संस्था उभ्या केल्या,  संवैधानिक दर्जा देत त्या टिकवल्या.  

सध्या देशात नेहरूद्वेषाचे वातावरण जाणीवपूर्वक तापवून त्यांची बदनामी करण्याची एक प्रथाच पडत चालली आहे. नेहरू गेल्यानंतरही ५८ वर्षांहून अधिक वर्षे लोटली तरी विरोधकांना त्यांची बदनामी करण्याची गरज भासते, यावरूनच नेहरूंची महानता दिसून येते. नेहरूंनी निर्माण केलेल्या लोकशाही संस्था आज हेतुपुरस्सर उद्ध्वस्त  केल्या जात आहेत. जसे की : सुधारणांचा पटल एकजिनसी राहावा आणि राज्यांच्या योजनांना काही निकष लावून आणि अभ्यासांती ती राबवली जावीत, या हेतूने जवाहरलाल  नेहरूंनी नियोजन आयोगाची बांधणी केली; पण २०१४ पासून नियोजन आयोगाची जागा नीती आयोगाने घेतली.

नेहरूंनी स्थापन केलेल्या नवरत्न कंपन्या; ज्यांचे वर्णन नेहरूंनी आधुनिक भारतातील मंदिरे, असे केले होते, त्या सरकारने विक्रीस काढल्या आहेत. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना देशात इतका जनाधार होता की, ते सहज हुकूमशहा बनू शकले असते. कारण नेहरू पंतप्रधानपदी असल्याच्या आपल्या संपूर्ण १६-१७ वर्षांच्या कार्यकाळात संसदेतील विरोधी पक्षांचे संख्याबळ कायम एकतृतीयांशापेक्षा कमी राहिले. तरीही केवळ संसदेतील सत्ताधारी पक्षाचे बहुमत म्हणजे लोकशाही नव्हे, हे त्यांनी आपल्या  उक्ती आणि कृतींतूनही सतत दाखवून दिले. 

स्वतःचे कर्तृत्व नसेल, तर  इतिहासाचा आधार घ्यावाच लागतो. सांप्रत  ‘इतिहासजीवी’ लोकांना इतकेच सांगावेसे वाटते की, इतिहासातील जखमा या कोणत्याही उपायांनी वर्तमानात भरून येऊ शकत नाहीत, याची जाणीव नसेल, तसेच इतिहासातील मढी उकरण्यासाठी वर्तमान किती खर्ची घालणार, याचे तारतम्य नसेल, तर भविष्य घडणे तर दूरच; पण ते करपण्याचीच शक्यता अधिक. त्यामुळे इतिहासातील उणीदुणी काढण्याऐवजी वर्तमानात अनेक उणिवा आहेत, त्यांची  धुणी धुतली जाणे महत्त्वाचे आहे. 

टॅग्स :Jawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूManmohan Singhमनमोहन सिंग