शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'मग ST कर्मचाऱ्यांच्या डेथ सर्टीफिकेटवर मुख्यमंत्र्यांचा फोटो छापायचा का?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 13:10 IST

नगर जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, ज्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, मग त्यावरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटो छापायचा का? असा प्रतिप्रश्न विखे पाटील यांनी केला आहे

ठळक मुद्दे  अहमदनगरमध्ये झालेल्या अग्नितांडवात 12 रुग्ण मयत झाले. मग, ज्यांचे मृत्यू झाले त्यांच्या डेथ सर्टिफिकेटवर मग मुख्यमंत्र्यांचा फोटो छापायचा का?.

नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार अमोल कोल्हे यांचं संसदेतील भाषण चर्चेचा विषय बनलं आहे. कोरोना विषयावरील चर्चासत्रात खासदार कोल्हेंनी तुफान फटकेबाजी करताना मोदी सरकारला लक्ष्य केले. तर, राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कामाचे कौतुकही केले. तर, मोदी सरकारवर जबरी टीका केली होती. कोल्हेंच्या या टीकेला आता भाजपा नेते आणि अहमदनगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी जशास तसे प्रत्युत्तर दिलंय. 

खासदार कोल्हेंनी कोरोना कालावधील मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची जबाबदारी मोदी सरकार घेणार का, असे म्हटले. डॉ. कोल्हेंनी मोदींना उद्देशून कवितेच्या माध्यमातून टोला लगावला. "अगर जीत का सेहरा बंधवाना हो तो,पराजय का बोझ भी स्वीकारना होगा"'जर लसीकरण प्रमाणपत्रावर फोटो छापायचा असेल तर मृत्यू प्रमाणपत्राची जबाबदारी पण घ्यायला हवी', असे कोल्हेंनी म्हटले होते. कोल्हेंच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना, राज्यातील ST कामगारांच्या डेथ सर्टीफिकेटवर मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा फोटो छापायचा का? असा प्रतिप्रश्न केला एबीपी माझाशी बोलताना आहे.    अहमदनगरमध्ये झालेल्या अग्नितांडवात 12 रुग्ण मयत झाले. मग, ज्यांचे मृत्यू झाले त्यांच्या डेथ सर्टिफिकेटवर मग मुख्यमंत्र्यांचा फोटो छापायचा का?. नगर जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, ज्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, मग त्यावरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटो छापायचा का? असा प्रतिप्रश्न विखे पाटील यांनी केला आहे. तसेच, राजकारण करणाऱ्यांना आम्ही जशास तसे उत्तर द्यायला कमी पडणार नाही. सरकारच्या काळातील आत्महत्येनुसार फोटो छापायला लागले तर सर्वात जास्त डेथ सर्टिफिकेटवर महाविकास आघाडी सरकारमधील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे लागतील, दुसरे कोणाचेही नाही, असे म्हणत सुजय विखे यांनी अमोल कोल्हेंच्या टीकेवरुन महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केले. 

तिन्ही नेत्यांना भारतरत्न द्यावा

राज्याच्या महाविकास आघाडी सरकारमदील तिन्ही पक्षाच्या नेत्यांना प्रत्येकी एक-एक भारतरत्न द्यायला हवा, एवढं त्यांचं काम कौतुकास्पद आहे. यांनी ग्लोबल टेंडर काढलं होतं, एक तरी लस विकत घेतली का? असा सवाल सुजय विखेंनी विचारला. संसदेत काल बुस्टर डोसची चर्चा झाली, त्यावर स्वत: WHO ने बुस्टर डोसची गरज नसल्याचं म्हटलं आहे. तसेच, खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेलाही सुजय विखे यांनी प्रत्युत्तर दिलं.

टॅग्स :Sujay Vikheसुजय विखेUddhav Thackerayउद्धव ठाकरेST Strikeएसटी संपFarmerशेतकरी