शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

International Nurses Day 2020 : ...म्हणून 'या' राज्यातील नर्सना आहे जगभरात पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 14:46 IST

विशेष म्हणजे भारताचा एक भाग नर्सिंग व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे.

ठळक मुद्देआंतरराष्ट्रीय नर्स डे केवळ भारतातच नव्हे, तर 12 मे रोजी संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. आज परिचारिका दिनाच्या दिवशी कोरोनाशी लढा देणाऱ्या नर्सचं सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. दक्षिण भारतात केरळ हे एकमेव राज्य आहे, जिथे नर्सिंग प्रोफेशनला सर्वाधिक पसंती दिली जाते.

नवी दिल्लीः आंतरराष्ट्रीय नर्स डे केवळ भारतातच नव्हे, तर 12 मे रोजी संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. आज परिचारिका दिनाच्या दिवशी कोरोनाशी लढा देणाऱ्या नर्सचं सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. विशेष म्हणजे भारताचा एक भाग नर्सिंग व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे. दक्षिण भारतात केरळ हे एकमेव राज्य आहे, जिथे नर्सिंग प्रोफेशनला सर्वाधिक पसंती दिली जाते. केवळ राज्यातील महिलांनाच हा व्यवसाय आवडत नाही, तर या राज्यातील नर्सना देखील जगभरात पसंती आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, समर्पण, बुद्धिमत्ता आणि वक्तशीरपणाच्या बाबतीत दक्षिण भारतातील परिचारिकांना तोड नाही. दक्षिण भारतातील बहुतेक स्त्रिया नर्सिंगमध्ये करिअर बनवण्यासाठी उत्सुक असतात. यामागील एक कारण म्हणजे केरळ, कर्नाटकमध्ये शेकडो नर्सिंग कॉलेज आणि इतर संस्था आहेत, ज्या दरवर्षी नर्सना प्रशिक्षण देत असतात. नर्सिंग अभ्यास तिथे आवडीनं शिकवला जातो.शेजारील देश अनेकदा केरळमधील नर्सिंग विद्यार्थ्यांचे निरीक्षण करतात. त्यांना असा विश्वास आहे की, इथल्या नर्सिंगच्या विद्यार्थिनी पेशाला वाहून घेतात आणि भावनेने काम करतात. त्यांची कार्यक्षमता खूप उत्कृष्ट आहे. त्यामुळे परदेशात भारतीय परिचारिकांना जास्त मागणी आहे.आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे केरळमध्ये साक्षरता खूप जास्त आहे आणि इतर राज्यांपेक्षा स्त्रियांचे प्रमाणही जास्त आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि हार्ट केअर फाऊंडेशनचे संस्थापक सदस्य पद्मश्री डॉ. केके अग्रवाल म्हणतात की, आवड म्हणून या व्यवसायाला प्राधान्य देत नर्सिंग व्यवसायात जाणे सर्वात महत्त्वाचे आहे.जर आपण हा व्यवसाय करिअर आणि आवड म्हणून स्वीकारला असेल तरच आपण तिथे चांगलं काम करू शकता. दक्षिण भारतातील बहुतेक स्त्रियांना बालपणापासूनच या व्यवसायाची आवड आहे. याच कारणास्तव केरळच्या परिचारिकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर पसंती दिली जाते. कोरोनासारख्या आजाराच्या वेळी केरळने उत्तम आरोग्य सेवा आणि परिचारिकांच्या समर्पित भावनेमुळे कोरोनावर नियंत्रण मिळवलं आहे. 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : येत्या दोन ते तीन दिवसांत सरकार नवं पॅकेज देणार, नितीन गडकरींचं मोठं विधान

CoronaVirus : निसर्गाचा चमत्कार! बिजनौरहून स्पष्ट दिसतोय नैनितालचा पर्वत

चीनच्या हेलिकॉप्टर्सची LACच्या हद्दीत घुसखोरी, भारतीय IAF लढाऊ विमानांनी लावलं हुसकावून

दोन माजी पंतप्रधानांविरोधात ट्विटरवर आक्षेपार्ह लिहिल्यानं भाजपाच्या संबित पात्रांविरोधात गुन्हा दाखल

भारतीय जवानांशी सिक्कीममध्ये भिडल्यानंतर चीननं दिली अशी प्रतिक्रिया

लॉकडाऊन वाढवणं अर्थव्यवस्थेसाठी आत्मघातकी ठरेल- आनंद महिंद्रा

CoronaVirus News : चिनी हॅकर्सकडून कोरोनाच्या संशोधनासंबंधी माहिती चोरण्याचा प्रयत्न, अमेरिकेचा गंभीर आरोप

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या