विराटने परदेशात विवाह का केला? - भाजपा आमदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 00:54 IST2017-12-20T00:54:28+5:302017-12-20T00:54:47+5:30
विराट कोहलीने भारतात पैसे कमावले, नाव कमावले, पण तो लग्न करायला परदेशात गेला, याबद्दल गुणाचे आमदार पन्नालाल शाक्य यांनी टीका केली आहे.

विराटने परदेशात विवाह का केला? - भाजपा आमदार
गुणा (मध्य प्रदेश) : विराट कोहलीने भारतात पैसे कमावले, नाव कमावले, पण तो लग्न करायला परदेशात गेला, याबद्दल गुणाचे आमदार पन्नालाल शाक्य यांनी टीका केली आहे.
कौशल्यविकास केंद्राचे उद्घाटन करताना ते म्हणाले की, या देशात पैसे कमावणाºया विराटला विवाहासाठी जागा सापडली नाही की काय? की भारत त्याला अस्पृश्य आहे.
भगवान राम, भगवान कृष्ण, विक्रमादित्य, युधिष्ठिर यांनी याच भूमीवर विवाह केला. आपल्यापैकी कोणीही विवाहासाठी परदेशात गेलो नाही. पण इथे करोडो रुपये कमावणाºया कोहलीने विवाहासाठी इटलीत खर्च केला. विराटला भारताविषयी आदर नाही, असे सांगून आ. शाक्य यांनी तो देशभक्त नसल्याचेच सिद्ध होत नाही का?, असा प्रश्नही केला आहे. (वृत्तसंस्था)