शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महिला व पुरुषांचे बुथ एकत्र का? गावाचा मतदानावरच बहिष्कार; महिलांचेही समर्थन

By कमलेश वानखेडे | Updated: November 26, 2022 12:57 IST

ध्राफा हे सुमारेे ५०० घरांचे गाव. पूर्णपणे किल्ल्याच्या आत वसलेलं. संपूर्ण गावाला किल्ल्याच्या मोठमोठ्या भिंतींची तटबंंदी. येथील राजपूत स्त्रिया घरातही घुंगट ओढतात.

कमलेश वानखेडे -ध्राफा (जामजोधपूर) : जामनगर जिल्ह्याच्या सीमेवर जामजोधपूर विधानसभा क्षेत्रांतर्गत  येणारे ध्राफा हे सुमारे १,३०० लोकवस्तीचे गाव. राजपूतबहूल असलेल्या या अख्ख्या गावानेेच मतदानावर बहिष्कार टाकला आहे. स्वातंत्र्यानंंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीपासून या गावातील महिला व पुरुषांसाठी वेगवेेगळी मतदान केंद्र असायची. मतदार यादीही स्वतंत्र असायची. मात्र, या निवडणुकीत मतदान केंद्र एकत्र केल्यामुळेे आपल्या परंपरेला तडा जात असल्याचे कारण देेत गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केेली आहे. ध्राफा हे सुमारेे ५०० घरांचे गाव. पूर्णपणे किल्ल्याच्या आत वसलेलं. संपूर्ण गावाला किल्ल्याच्या मोठमोठ्या भिंतींची तटबंंदी. येथील राजपूत स्त्रिया घरातही घुंगट ओढतात. सार्वजनिक ठिकाणी पुरुषांसमोर येत नाहीत, अशी येथील रित. त्यामुळे स्वातंत्र्यानंंतरही या गावातील स्त्रिया मतदानच करीत नव्हत्या. त्यामुळेे सुमारे ५० वर्षांपूर्वी येथील स्त्री व पुरुषांसाठी किल्ल्याच्या आतच वेगवेगळेी मतदान केंद्र ठेवली जाऊ लागली. कुठलीही निवडणूक असो, मतदान केंद्र वेगवेगळीच असणार. एवढेच नव्हे तर महिलांच्या मतदान केंद्रांवर निवडणूक अधिकारी, पोलिंग एजंटही महिलाच दिल्या जायच्या. निवडणूक यंत्रणेने आमच्या परंपरेेला तडा दिल्याचे कारण देेत या अख्ख्या गावानेे आमसभेत ठराव घेत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेेतला. जिल्हाधिकारी, निवडणूक अधिकारी, मुख्यमंत्री व पंतप्रधान कार्यालयांपर्यंत निवेदने देऊन कळविले. विशेष म्हणजे या निर्णयाला येथील महिलांचाही पाठिंबा आहे. 

राजकीय पक्षांना प्रचारासाठी ‘नो एन्ट्री’ -आपली मागणी मान्य होईपर्यंत कुठल्याही राजपक्षाला प्रचारासाठी ‘नो एन्ट्री’ असेल, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेेतली आहे. गावात प्रचाराचे वाहन शिरू नये म्हणून मुख्य गेेटजवळ युवक बसलेले असतात. लोकमत प्रतिनिधीने येथेे भेट दिली असता भाजपचे होर्डिंग घेऊन एक वाहन तेथे आले. गावकऱ्यांनी लगेेच ते गेटवरच थांबवले. मागणीचा फलक दाखवत परत पाठविले. 

मुला-मुलींची शाळाही वेगवेेगळी -या गावात ८वीपर्यंत मुला-मुलींची शाळाही वेगवेगळी होती. मुलांसाठी कुमार शाळा व मुलींसाठी कन्या शाळा. मात्र, गेेल्या सत्रात पटसंख्येेअभावी दोन्ही शाळा सरकारनेे एकत्र केल्या. 

सरपंच म्हणतात, यापुढेही बहिष्कार! -लोकमत प्रतिनिधीने गावचे सरपंच धर्मेद्रसिंह डी. जडेजा यांची भेट घेतली. त्यांनीही गावकऱ्यांच्या भूमिकेेचे समर्थन केलेे. ते म्हणाले, स्त्री व पुरुषांचेे मतदान वेगवेगळ्या केंद्रांवर घेण्याची रित येथे फार पूर्वीपासून आहे. मात्र चर्चा न करता मतदान केंद्र एकत्र केेले. त्यामुळे आम्ही मतदानावर बहिष्काराचा निर्णय घेतला. सरकारने पूर्ववत स्थिती केेली नाही तर यापुढेही कुठल्याच निवडणुकीत मतदान न करण्याच्या भूमिकेवर गावकरी ठाम आहेत.

टॅग्स :Gujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022GujaratगुजरातElectionनिवडणूक