आजही देशाच्या भूमीत चीनचे सैनिक का बसले आहेत; काँग्रेसचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 06:25 AM2021-06-16T06:25:05+5:302021-06-16T06:25:43+5:30

गलवान खोऱ्यातील संघर्षाला वर्ष पूर्ण; २० जवान झाले होते शहीद

Why are Chinese soldiers still sitting on the country's soil today; Congress question | आजही देशाच्या भूमीत चीनचे सैनिक का बसले आहेत; काँग्रेसचा सवाल

आजही देशाच्या भूमीत चीनचे सैनिक का बसले आहेत; काँग्रेसचा सवाल

googlenewsNext

- शीलेश शर्मा 
लोकमत न्यूज नेटवर्क 
नवी दिल्ली : गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांशी झालेल्या संघर्षात २० सैनिकांना हौतात्म्य मिळाले. त्यानंतरही महत्त्वाच्या ठिकाणांवर चीनचे सैनिक बसले असून मोदी सरकार मौन बाळगून आहे, असा आरोप काँग्रेसने केला.

पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून १५ जून, २०२० रोजी झालेल्या त्या संघर्षाची आठवण करून देत मागणी केली की, मोदी सरकारने देशाला विश्वासात घ्यावे म्हणजे देश आणि सीमेवर उभ्या असलेल्या जवानांना खात्री वाटेल की, सरकार म्हणते तसे वागत आहे.
पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी १५-१६ जून रोजीच्या त्या घटनेवर व्हिडिओसह ट्वीटरवर भाष्य केले. ते म्हणाले, “ त्या घटनेशी संबंधित अनेक प्रश्न आहेत की ज्यांची उत्तरे मिळाली नाहीत. सरकार जनतेला जबाबदार आहे.” पक्षाचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला म्हणाले की, “आमच्या २० योद्ध्यांना हुतात्मा होऊन एक वर्ष झाले. चीनचा आजही आमच्या जमिनीवर कब्जा आहे. मोदी सरकार देशाच्या संरक्षणात अपयशी ठरले आहे.” पक्षाच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी मोदी यांच्यावर टीका करताना आठवण करून दिली की, मोदी म्हणाले  होते की “कोणी घुसखोरी केलेली नाही.” 

‘सर्वोच्च बलिदान कायम देशाच्या स्मरणात राहील’
n    पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात गेल्या वर्षी १५ व १६ जून रोजी चीनच्या सैन्याशी लढताना हुतात्मा झालेल्या २० भारतीय जवानांना लष्कर प्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांंनी मंगळवारी आदरांजली अर्पण केली. 
n    जनरल नरवणे म्हणाले,“चीनच्या अभूतपूर्व अशा आक्रमणात जवानांनी अतिशय कठीण अशा उंच भागात लढून केलेले सर्वोच्च बलिदान देशाच्या कायम स्मरणात कोरलेले राहील.” जवळपास पाच दशकांनंतर चीनशी प्रथमच झालेला हा अत्यंत हिंसक असा संघर्ष होता.

Web Title: Why are Chinese soldiers still sitting on the country's soil today; Congress question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.