शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

हवा कुणाची? सायकलची की कमळाची? अमरोह जिल्ह्यात भाजपच्या सत्तेला सपाचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 08:20 IST

अमरोह जिल्ह्यात विधानसभेचे चार मतदारसंघ आहेत. त्यापैकी ३ भाजपकडे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलची ‘क्रेझ’ आजही येथे कायम आहे.

मनाेज मुळ्ये -अमरोह : जिल्ह्यात चारपैकी तीन मतदारसंघांत आमदारकी मिळवणाऱ्या भाजपसमोर आता समाजवादी पक्षाने आव्हान उभे केले आहे. २०१७ चा हा करिश्मा कायम ठेवण्यासाठी भाजपला मतांचे ध्रुवीकरण रोखण्याची गरज आहे. बहुजन समाज पार्टी आणि काँग्रेस मात्र या मतदारसंघात खूप मागे आहेत. अमरोह जिल्ह्यात विधानसभेचे चार मतदारसंघ आहेत. त्यापैकी ३ भाजपकडे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलची ‘क्रेझ’ आजही येथे कायम आहे. त्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संघटित गुन्हेगारीवर बरेच नियंत्रण आणले आहे. राम मंदिराचा मुद्दा आजही येथील लोकांसाठी खूप भावनिक आणि जिव्हाळ्याचा आहे.काही गोष्टी भाजपला सकारात्मक असल्या तरी या मतदारसंघात सपाकडून भाजपसमोर आव्हान उभे आहे. जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या अमरोह विधानसभा मतदारसंघात सपाचे मेहबूब अली २००२ पासून सलग चार वेळा आमदार झाले आहेत. शेतकरी आंदोलनामुळे जाट समाजाची मते मोठ्या प्रमाणात भाजपच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे. या मतांमध्ये मोठा वाटा सपाशी युती असलेल्या  राष्ट्रीय लोक दलाचा आहे. त्यामुळे जाट समाजाच्या मतांचा फायदा सपाला होणार आहे. या मतदारसंघातील चारही जागा सपाच लढवत आहे. येथील मुस्लीम वर्ग कायम सपाच्या पाठीशी आहे. त्यामुळे या निवडणुकीत सपाकडून कडवे आव्हान उभे केले जात आहे.

बसप, काँग्रेस गायबच- येथील चार मतदारसंघांत भाजप आणि सपाचीच चर्चा अधिक आहे. - येथे बसपा, काँग्रेस मात्र बाजूलाच फेकले गेले असल्याचे चित्र दिसते. 

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२Uttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाSamajwadi Partyसमाजवादी पार्टी