शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

‘हाॅट सीट’मध्ये ‘कैची’ काेणाचा पत्ता कापणार?; पूर्णियामध्ये पप्पू यादवांमुळे त्रिकाेणी लढत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 06:30 IST

कुशवाहा यांनी अजीत यांना आदरांजली अर्पण करताना पप्पू यांच्यावर नाव न घेता टीका केली

एस. पी. सिन्हा/विभाष झा

पाटणा : बिहारमधील एका मतदारसंघाची देशभरात चर्चा आहे, ताे म्हणजे पूर्णिया. या ठिकाणी बाहुबली राजकारणी पप्पू यादव यांनी बंडखाेरी केली असून ते अपक्ष निवडणूक लढवित आहेत. लालु यादव यांच्या ‘आरजेडी’च्या बीमा भारती आणि ‘एनडीए’चे उमेदवार संताेषकुमार कुशवाहा यांना त्यांचे कडवे आव्हान आहे. दाेन्ही उमेदवारांनी पप्पू यांना शह देण्यासाठी अजीत सरकार हत्याप्रकरण उचलून धरले. त्यामुळे पूर्णियामध्ये वातावरण चांगलेच तापले आहे.

कुशवाहा यांनी अजीत यांना आदरांजली अर्पण करताना पप्पू यांच्यावर नाव न घेता टीका केली. ते म्हणाले, ‘अजीत यांची ज्यांनी हत्या केली, जाे व्यापाऱ्यांकडून खंडणी वसूल करायचा, त्याला जनता ओळखून आहे. जनता पुन्हा पूर्णियाला जंगलराज बनू देणार नाही.’ तर बीमा भारती यांनी अजीत हे गाेरगरिबांचे नेते हाेते, असा उल्लेख केला. 

१९९०ची पुनरावृत्ती हाेणार?पप्पू यादव  हे १९९०मध्ये सर्वप्रथम मधेपुरा येथून अपक्ष आमदार म्हणून निवडून गेले हाेते. त्यांची सीमांचल भागात प्रचंड दहशत हाेती. माकप नेते अजीत सरकार यांच्या हत्येचा त्यांच्यावर आराेप हाेता. त्यांना शिक्षाही झाली हाेती. मात्र, उच्च न्यायालयाने पुरव्याच्या अभावी त्यांची सुटका केली. आता ते पुन्हा अपक्ष लढत असून १९९०चा कित्ता पुन्हा गिरविण्याच्या प्रयत्नात आहेत. 

युपीए, एनडीए अडचणीतपप्पू यादव यांना निवडणूक आयाेगाने कैची हे चिन्ह दिले आहे. त्यांच्या कैचीमध्ये युपीए आणि एनडीएचे उमेदवार अडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याचवेळी काॅंग्रेसच्या खासदार असलेल्या त्यांच्या पत्नी रंजीता रंजन या विराेधात प्रचार करताना दिसणार आहेत. 

असे आहे मतदारांचे समीकरण

७ लाख अल्पसंख्याक५ लाख मागासवर्गीय१.५ लाख यादव२.५ लाख ब्राह्मण व राजपूत

टॅग्स :bihar lok sabha election 2024बिहार लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabhaलोकसभाElectionनिवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेस