लोकसभेत उडी मारण्यामागे कुणाचं 'डोकं'? पोलिसांना मिळाली महत्वाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2023 16:14 IST2023-12-17T16:12:45+5:302023-12-17T16:14:08+5:30
Parliament Security Breach : यासंदर्भात सातत्याने नव-नवे खुलासे होत आहेत. आता या संपूर्ण प्रकरणात आणखी एक खुलासा झाला आहे.

लोकसभेत उडी मारण्यामागे कुणाचं 'डोकं'? पोलिसांना मिळाली महत्वाची माहिती
संसदेत लोकसभेचे कामकाज सुरू असताना व्हिजिटर गॅलरीतून दोन तरुणांनी सभागृहात उडी मारून सर्वत्र धूरच धूर पसरवल्याच्या घटनेने दिल्लीसह संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. याप्रकरणी सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. यानंतर, यासंदर्भात सातत्याने नव-नवे खुलासे होत आहेत. आता या संपूर्ण प्रकरणात आणखी एक खुलासा झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा सभागृहात प्लॅनिंगनुसार उडी मारता यावी, यासाठी सागर शर्मा आणि मनोरंजन हे दोन आरोपी संसदेच्या व्हिजिटर गॅलरीतील पहिल्या रांगेत बसले होते. कारण मागच्या रांगेत बसले तर सभागृहात उडी मारणे शक्य होणार नाही, हे या दोघांनाही माहीत होते. इस प्लॅनिंगचा सूत्रधार मनोरजंन होता. कारण तो रेकी दरम्यान एकदा बजेट सत्रामध्ये संसद भवनाच्या व्हिजिटर्स गॅलरीमध्ये पहिल्या रांगेत बसला होता.
व्हिजिटर गॅलरीच्या पहिल्या रांगेत बसायचे असेल तर, चेकिंगसाठी वेळेवरच संसदेत पोहोचायचे आहे, हे आरोपींना माहीत होते. याशिवाय, मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीपासून जवळपास 450 किलोमीटर अंतरावर असलेल्या नागौरमधील कुचामन सिटी जवळील त्रिशंगया गावातील एका होटेलमध्ये महेश कुमावतने संसद कांडातील मास्टरमाइंड ललित झाती व्यवस्था केली होती.
यानंर, 13 डिसेंबरच्या रात्री ललित आणि महेश यांनी 4 मोबाइल जाळले. जे या संपूर्ण प्रकरणात महत्वाच पुरावा होते. तत्पूर्वी 17 डिसेंबरला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने राजस्थानच्या नागौर येथून सर्व आरोपींचे जळालेल्या अवस्थेतील मोबाईल जप्त केल्याचे आहेत.