शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
5
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
6
इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
7
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
9
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
10
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
11
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
12
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
14
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
15
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
16
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
19
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
20
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

महिला प्रवाशांच्या सुरक्षेची खात्री कोण देणार!

By admin | Updated: February 11, 2015 00:33 IST

-ठोस पावले उचलण्याची गरज : बसने प्रवास करणाऱ्या महिला असुरक्षित

-ठोस पावले उचलण्याची गरज : बसने प्रवास करणाऱ्या महिला असुरक्षित
-लोकमत जागर

नागपूर : ट्रॅव्हल्स बसने प्रवास करणाऱ्या महिला सुरिक्षत आहेत का? हा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे. काही ट्रॅव्हल्स कंपन्या महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा दावा करीत असल्या तरी खात्री कोण देणार? यामुळे महिलांमध्ये असुरक्षेची भावना वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी शहरातील विविध ठिकाणाहून ट्रॅव्हल्स करणाऱ्या महिलांना याबाबत बोलते केले असता, त्यांना हा प्रवास असुरिक्षत वाटत असल्याचे दिसते. अनेकदा त्या जीव मुठीत धरून हा प्रवास करतात. खूपच उशीर झाल्यास काहीजणी प्रवास टाळण्यासाठी कोणाच्या तरी घरी राहणे पसंत करतात. नुकताच ट्रॅव्हल्स बसमध्ये एका महिला वकिलाचा विनयभंग करणाऱ्या घटनेनंतर महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे . त्यावर नुसती चर्चा करण्यापेक्षा ठोस पावले उचलणे अधिक गरजेचे असल्याचे महिलांचे म्हणणे आहे. .
-समोरची व्यक्ती ओळखूनच प्रवासाचे तिकीट द्यावे
(फोटो-डीएससी ०५२२)
सोनाली जेनेकर म्हणाल्या, आज समाजात पुरु षांचा महिलांना पाहण्याचा दृष्टिकोन बदलेला आहे. कित्येक कठोर कायदे बनवूनदेखील राजरोजपणे दिवसाढवळ्या अत्याचार, विनयभंग, लूट इत्यादी गोष्टी घडत आहेत. आज परिस्थिती एवढी भयानक आहे की कोणत्याही परपुरु षावर महिला विश्वास ठेवूच शकत नाही. यामुळे ट्रॅव्हल्सचे तिकीट देताना समोरची व्यक्ती कशी आहे, हे ओळखणारी यंत्रणाच असावी. उदा. दारुडे व इतर व्यसनी लोकांना तिकीट देऊच नये.
- लांबचा प्रवास धोकादायकच
व्ही. राधिका म्हणाल्या, आपण एकटे असाल आणि लांबचा प्रवास असेल तर तो धोकादायक ठरू शकतो. शहरातील प्रवासाची तेवढी भीती वाटत नाही. परंतु हे थांबायला हवे. यासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे. विशेषत: ज्या ट्रॅव्हल्समधून आपण प्रवास करतो त्या ट्रॅव्हल्सने तरी ही जबाबदारी घ्यायला हवी.
-महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी घ्यावी
(फोटो-डीएससी ०५२२)
नाज शेख म्हणाल्या, महिला प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी घ्यावी. विशेषत: बसचालक आणि कंडक्टर यांनी याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. कोणी प्रवासी शहाणपणा करीत असेल तर त्याला त्याच ठिकाणी उतरविण्याची हिंमत त्यांच्याकडे असावी. याशिवाय बसच्या आतही सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, महिलांच्या बाजूला महिलांनाच सीट देण्यास प्राथमिकता द्यावी.