शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Lockdown Extension : योग्य वेळी कठीन निर्णय, डब्ल्यूएचओकडून भारताची प्रशंसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 17:03 IST

मोदींनी घेतलेल्या या निर्णयाची आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटनेने प्रशंसा केली आहे. भारताने केलेली ही घोषणा म्हणजे योग्यवेळी घेतेला कठीन निर्णय असल्याचे डब्ल्यूएचओने म्हटले आहे.

 who lauds prim minister modi decision of extension lockdown till 3rd mayनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगलवारी देशातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढविण्याची घोषणा केली. मोदींनी घेतलेल्या या निर्णयाची आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटनेने प्रशंसा केली आहे. भारताने केलेली ही घोषणा म्हणजे योग्यवेळी घेतेला कठीन निर्णय असल्याचे डब्ल्यूएचओने म्हटले आहे.

डब्ल्यूएचओच्या आग्नेय आशियाच्या क्षेत्रीय संचालक डॉ. पूनम खेत्रपाल सिंह म्हणाल्या, अनेक प्रकारची आव्हाने असतानाही भारत खंबीरपणे कोरोनाचा सामना करत आहे. कोरोनासारख्या या संकटाच्या काळात सर्व भार अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर आहे. खरे तर ही वेळ कोरोनाला पराभूत करण्यासाठी प्रत्येकाने आपेल पूर्णपणे योगदान करण्याची आहे.

नव्या भागात कोरोनाचा फैलाव होऊ नये -नव्या लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसंदर्भात बुधवारी सविस्तर दिशा निर्देश दिले जातील. मी सर्व देशातील जनतेला प्रार्थना करतो, की आता या कोरोनाला आपल्याला कुठल्याही परिस्थितीत नव्या भागात जाऊ द्यायचे नाही. आता स्थानिक पातळीवर एक जरी व्यक्ती कोरोना बाधित आढळला, तर ही देशासाठी चिंतेची बाब ठरेल, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

आपली तुलना कोणत्याही देशाशी करणं योग्य ठरणार नाही, पण... - योग्य वेळी घेतलेल्या निर्णयांमुळे, लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगमुळे आपली स्थिती बलाढ्य देशांच्या तुलनेत चांगली असल्याचं मोदी म्हणाले. आपली तुलना कोणत्याही देशाशी करणं योग्य ठरणार नाही. पण जगातील बलाढ्य देशांशी तुलना करता आपण अतिशय चांगल्या स्थितीत आहोत. महिना दीड महिन्यापूर्वी बरेचसे देश आपल्या बरोबरीत होते. मात्र आत्ता तिथे कोरोनाचे रुग्ण २५ ते ३० पट आहेत. मृतांचा आकडा हजारोंच्या घरात आहे. आपण योग्य वेळी निर्णय घेतले नसते, तर आपली स्थिती काय असली असती, याची कल्पनाही करवत नाही, असे मोदी म्हणाले.

मागील दिवसांमधील स्थिती पाहिल्यास, आपण जे केलंय ते योग्य होतं याची खात्री पटते. लॉकडाऊन, सोशल डिस्टन्सिंगचा फायदा देशाला झाला. त्याची आर्थिक किंमत आपण चुकवली. पण देशाच्या नागरिकांच्या जीवापुढे ती किंमत काहीच नाही. अतिशय कमी संसाधनं असताना आपण उत्तम कामगिरी केली. त्याची जगभरात चर्चा होत आहे, अशा शब्दांत मोदींनी देशवासीयांनी दाखवलेल्या संयमाचं कौतुक केलं. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याWorld health organisationजागतिक आरोग्य संघटनाNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाBJPभाजपाIndiaभारत