शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

PM मोदींनंतर पंतप्रधान पदासाठी सर्वात लोकप्रिय व्यक्ती कोण? सर्व्हेत समोर आलं नाव, जाणून चकित व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2024 09:13 IST

खरे तर, भाजपने यापूर्वीच्या दोन निवडणुका या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लढवल्या आहेत आणि आता तिसरी निवडणूकही त्यांच्याच नेतृत्वात लढवली जात आहे. मात्र विरोधकांकडून पंतप्रधानपदासाठी चेहरा देण्यात आलेला नाही.

आगामी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा पंतप्रधानपदासाठीचा सर्वात लोकप्रिय चेहरा असल्याचे दिसत आहे. मात्र, नरेंद्र मोदींनंतर सर्वाधिक पसंती कुणाला? असा प्रश्न निर्माण होतो. खरे तर, भाजपने यापूर्वीच्या दोन निवडणुका या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लढवल्या आहेत आणि आता तिसरी निवडणूकही त्यांच्याच नेतृत्वात लढवली जात आहे. मात्र विरोधकांकडून पंतप्रधानपदासाठी चेहरा देण्यात आलेला नाही.

नेटवर्क18 ने केलेल्या एका ओपिनियन पोलनुसार, सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या 59 टक्के लोकांनी पंतप्रधान पदासाठी सर्वात सक्षम चेहरा म्हणजे नरेंद्र मोदी असल्याचे म्हटले आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस नेते राहुल गांधी आहेत. या सर्व्हेनुसार, 21 टक्के लोकांनी पंतप्रधान पदासाठी राहुल गांधी सक्षम असल्याचे म्हटले आहे. या बाबतीत राहुल गांधी यांची लोकप्रियता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तुलनेत 38 टक्के कमी आहे. 

या शिवाय या सर्व्हेमध्ये सहभागी 9 टक्के लोकांनी तृणमूल काँग्रेस अध्यक्ष ममता बनर्जी आणि आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल हे पंतप्रधान पदासाठी सक्षम असल्याचे म्हटले आहे. या मेगा ओपिनियन पोलमध्ये 21 प्रमुख राज्यांच्या 518 लोकसभा मतदारसंघांचा समावेश होता. 12 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान हा सर्व्हे करण्यात आला. अर्थात एकूण 95 टक्के लोकसभा मतदारसंघांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला.

ओपिनियन पोलनुसार, राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 80 जागांपैकी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) 77 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर विरोधी I.N.D.I.A. ला केवळ 2 जागा मिळू शकतात. तसेच, मायावतींच्या बहुजन समाज पक्षाला केवळ एक जागा मिळू शकते.

भाजपची दुसरी यादी जाहीर - यातच, भाजपने बुधवारी सायंकाळी 10 राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेशातील 72 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यात महाराष्ट्रातील केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल, राज्यातील मंत्री सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे यांचाही समावेश आहे. महत्वाचे म्हणजे, महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची घोषणा केली असून यातील 12 खासदारांना पुन्हा तिकीट देण्यात आले आहे, तर सात नव्या चेहऱ्यांना लोकसभेच्या रणांगणात उतरवण्यात आले आहे. भाजपने 2 मार्च रोजी 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. आजच्या 72 उमेदवारांसह भाजपने आतापर्यंत 267 उमेदवारांची घोषणा केली आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीMamata Banerjeeममता बॅनर्जीArvind Kejriwalअरविंद केजरीवालcongressकाँग्रेसBJPभाजपाlok sabhaलोकसभाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४