राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 17:48 IST2025-11-05T17:44:16+5:302025-11-05T17:48:14+5:30
राहुल गांधी यांनी उदाहरण देत सांगितले की एका ब्राझिलियन मॉडेलच्या नावावर हरियाणामध्ये तब्बल २२ वेगवेगळ्या ठिकाणी मतदान झाल्याचे दिसून आले आहे. या मॉडेलचे नाव मतदार याद्यांमध्ये आलेच कसे आणि तीच व्यक्ती विविध बूथांवर नोंदवली गेली कशी?

राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा हरियाणा विधानसभा निवडणुकीतील मतदान प्रक्रियेवर आणि मतदार याद्यांतील कथित गैरव्यवहारावरून गंभीर आरोप केले आहेत. राहुल यांनी बुधवारी (५ नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत, हरियाणाच्या मतदार यादीत सुमारे २५ लाखांहून अधिक बनावट मतदारांची नोंद असल्याचा दावा केला आहे.
राहुल गांधी यांनी उदाहरण देत सांगितले की एका ब्राझिलियन मॉडेलच्या नावावर हरियाणामध्ये तब्बल २२ वेगवेगळ्या ठिकाणी मतदान झाल्याचे दिसून आले आहे. या मॉडेलचे नाव मतदार याद्यांमध्ये आलेच कसे आणि तीच व्यक्ती विविध बूथांवर नोंदवली गेली कशी? या प्रकरणाशी संबंधित फोटो सोशल मीडियावर मॅथ्यूज फेरारो या नावाने शेअर करण्यात आला होता, यामुळे या गडबडीचे गांभीर्य अधिक अधोरेखित झाले नाही.
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेल्या त्या महिलेचे नाव, Matheus Ferroro नाही. तर Matheus Ferroro हे त्या फोटोग्राफरचे नाव आहे, ज्याने हा फोटो क्लिक केला होता. हा फोटो Unsplash आणि Pexels सारख्या वेबसाइट्सवर फोटोग्राफरच्या प्रोफाइलवर उपलब्ध.
A Brazilian citizen Matheus Ferroro voted in 22 names in Haryana under the names ranging from Sweety to Saraswathi. The wonder called @ECISVEEP!
— Congress Kerala (@INCKerala) November 5, 2025
Do you need more evidence that Haryana Elections were rigged totally? pic.twitter.com/sOPJ3G9JAM
काय म्हणाले होते राहुल गांधी? -
"हरियाणात एका तरुणीने वेगवेगळ्या नावांनी २२ वेळा मतदान केले. तरुणीने कधी सीमा, कधी स्वीटी आणि कधी सरस्वती म्हणून मतदान केले आहे." यावेळी त्यांनी "बनावट मतदान" करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मुलीचा फोटोही प्रसिद्ध केला. ते पुढे म्हणाले, हा फोटो देखील बनावट आहे कारण तो एका ब्राझिलियन मॉडेलचा आहे. हरियाणाच्या राय विधानसभा मतदारसंघात एका तरुणीने २२ वेळा मत दिलं. प्रत्येक मत वेगवेगळ्या नावाने होतं आणि १० मतदान केंद्रांवर नोंदणी केलेली होती. धक्कादायक बाब म्हणजे, ही महिला ब्राझिलियन मॉडेल मॅथ्यूस फेरेरो आहे.
राहुल गांधी म्हणाले की, हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव फक्त २२,७८९ मतांनी झाला, ज्यामुळे निवडणूक किती अटीतटीची होती हे दिसून येतं. हरियाणात पहिल्यांदाच पोस्टल बॅलेट प्रत्यक्ष निकालापेक्षा वेगळं होतं. यापूर्वी पाच प्रमुख एक्झिट पोलमध्ये हरियाणात काँग्रेसच्या विजयाचा अंदाज वर्तवण्यात आला होता.