शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोण आहेत के सुरेंद्रन? भाजपनं वायनाडमधून उतरवलं मैदानात, राहुल गांधींचं टेन्शन वाढवणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2024 09:48 IST

K Surendran vs Rahul Gandhi: भाजपने के सुरेंद्रन यांना मैदानात उरवल्याने राहुल गांधी यांच्या अडचणी वाढू शकतात. ते यावेळीही वायनाडमधूनच निवडणुकीच्या मैदानात उतरत आहेत. याशिवाय, अमेठीतूनही निवडणूक लढू शकतात अशी चर्चा आहे. मात्र भाजपने वायनाडसाठी घोषित केलेल्या उमेदवाराची चर्चा अधिक आहे. तर जाणून घेऊयात, कोण आहेत केरळ भाजपाध्यक्ष? का सुरू आहे त्यांची एवढी चर्चा...?

काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांना आव्हान देण्यासाठी भारतीय जनता पक्षाने वायनाडमधून प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांना मैदानात उतरवले आहे. सुरेंद्रन मैदानात उरल्याने राहुल गांधी यांच्या अडचणी वाढू शकतात. ते यावेळीही वायनाडमधूनच निवडणुकीच्या मैदानात उतरत आहेत. याशिवाय, अमेठीतूनही निवडणूक लढू शकतात अशी चर्चा आहे. मात्र भाजपने वायनाडसाठी घोषित केलेल्या उमेदवाराची चर्चा अधिक आहे. तर जाणून घेऊयात, कोण आहेत केरळ भाजपाध्यक्ष? का सुरू आहे त्यांची एवढी चर्चा...? केरळ भाजपाध्यक्ष के. सुरेंद्रन -- के. सुरेंद्रन हे नॉर्थ केरळमधील एक मोठे नेते आहेत. ते 2020 मध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले आहेत.  - गेल्यावेळी त्यांनी पथानामथिट्टा (Pathanamthitta) या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढली होती. मात्र ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले.- 2018 मध्ये सबरीमाला आंदोलनावेळी सुरेंद्रन यांना अटकही करण्यात आली होती. त्यावेळी ते एका महिन्याहूनही अधिक काळ जेलमध्ये होते.- के. सुरेंद्रन यांनी  2021 मध्ये केरळ विधानसभा निवडणुकीत दोन जागांवर निवडणूक लढली होती. मात्र या दोन्ही जागांवर त्यांचा पराभव झाला.- यावेळी सुरेंद्रन संपूर्ण तयारीत आहेत. उमेदवारी घोषित झाल्यानंतर, त्यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत आणि राहुल गांधींचा उल्लेख करत एक ट्विट केले आहे. त्यांनी एक्सवर लिहिले, 'मला हे सांगताना आनंद होत आहे की, भाजपने वायनाडमध्ये इंडी अलायन्सचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात एनडीएचा उमेदवार म्हणून माझ्या नावाची घोषणा केली.'

वायनाडमध्ये अशी होणार फाइट -विरोधी पक्षांनी I.N.D.I.A. नावाने आघाडी तयार केली असली तरी, काँग्रेस आणि राज्यातील सत्ताधारी पक्ष असलेला सीपीआय या दोघांनीही वायनाडमधून आपापले उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहेत. सीपीआयने ॲनी राजा यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे राहुल गांधींच्या मतांमध्ये विभाजनाचा धोका आहे. महत्वाचे म्हणजे, वायनाड हा रायबरेली आणि अमेठीप्रमाणेच काँग्रेसचा बालेकिल्ला मानली जातो. येथे गेल्या तीन लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने मोठ्या फरकाने विजय मिळवलेला आहे.

राहुल गांधी यांनी 2019 च्या निवडणुकीत वायनाडमध्ये सीपीआयच्या उमेदवाराचा 4.31 लाख मतांनी पराभाव केला होता. यावेळी, भाजपच्या उमेदवाराला केवळ 78,000 मतेच मिळाली होती आणि तो तिसऱ्या स्थानावर होता. मात्र यावेळी सुरेंद्रन हे राहुल गांधी यांना कडवे आव्हान देऊ शकतात, अशी आशा भाजपला आहे. 

टॅग्स :Keralaकेरळlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी