Smriti Irani’s Daughter Marriage: स्मृती इराणींचा जावई कोण? कुठला? काय करतो? संपत्ती किती? Apple मध्ये काय करत होता?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 20:36 IST2023-02-07T20:36:36+5:302023-02-07T20:36:54+5:30
स्मृती यांचे पती जुबिन हे जोधपूरला पोहोचले आहेत. तर स्मृती या उद्या बुधवारी तिथे पोहोचणार आहेत. असे असताना स्मृती यांच्या जावयाची चर्चा होऊ लागली आहे.

Smriti Irani’s Daughter Marriage: स्मृती इराणींचा जावई कोण? कुठला? काय करतो? संपत्ती किती? Apple मध्ये काय करत होता?
केंद्रीय़ मंत्री स्मृती इराणी यांची मोठी मुलगी शैनेल ईराणीचे राजस्थानमधील नागौंरच्या खिंवसर किल्ल्यात लग्न होणार आहे. आजपासून परवापर्यंत प्रीवेडिंग सेलिब्रेशन होणार आहे. स्मृती यांचे पती जुबिन हे जोधपूरला पोहोचले आहेत. तर स्मृती या उद्या बुधवारी तिथे पोहोचणार आहेत. असे असताना स्मृती यांच्या जावयाची चर्चा होऊ लागली आहे.
स्मृती इराणींचा जावई कोण? कुठला? काय करतो? संपत्ती किती? अशी सारी माहिती सर्च केली जात आहे. ३२ वर्षीय शैनेलचे लग्न अर्जुन भल्ला या तरुणाशी होणार आहे. २०२२ मध्ये त्यांचा साखरपुडा झाला होता. तेव्हा स्मृती यांनीच फोटो पोस्ट करून याची माहिती दिली होती. तसेच अर्जुनला सांभाळून रहा, असा सल्ला दिला होता.
अर्जुन भल्ला हा भारतीय नाहीय, परंतू अनिवासी भारतीय आहे. र्जुन भल्ला हा एक कॅनेडियन कायदेशीर व्यावसायिक आहे. त्याचे आई-वडील आणि आजी आजोबा हे भारतात जन्मले होते. अर्जुनच्या वडिलांचे नाव सुनील भल्ला आणि आईचे नाव शबिना भल्ला आहे. अर्जुन भल्लाचे संपूर्ण कुटुंब टोरंटो, ओंटारियो, कॅनडात राहत आहे. त्याचे सर्व शिक्षण तिथेच झाले आहे.
अर्जुनने मानसशास्त्र, नीतिशास्त्र आणि कायदा सोसायटीमध्ये बीएससी केली आहे. युनायटेड किंग्डमच्या लीसेस्टर विद्यापीठातून 2013 ते 2015 या शैक्षणिक वर्षात एलएलबी केली आहे. त्याने अॅपल कंपनीतही त्याने टेक्निशिअन म्हणून काम केलेले आहे. सध्या अर्जुन दुबई, संयुक्त अरब अमिराती येथे एका कायदेशीर फर्ममध्ये काम करत आहे. विश्वसनीय मीडिया स्त्रोतांनुसार, त्याची नेट वर्थ सुमारे $400K आहे.