शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून किरण सामंतांचा दावा
2
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
3
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
4
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
5
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
6
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
7
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
8
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
9
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
10
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
11
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
12
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
13
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
14
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
15
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
16
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
17
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
18
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
19
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
20
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

फारुक अब्दुल्लांच्या सुटकेमागे कोण? रॉच्या माजी प्रमुखाचा 'गौप्यस्फोट'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2020 3:26 PM

जम्मू-काश्मीरला असलेला विशेष दर्जा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने गेल्या वर्षी ५ ऑगस्ट रोजी घेतला. त्या दिवसापासून फारुक अब्दुल्ला यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

ठळक मुद्देनजरकैदेत असलेले जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांची शुक्रवारी अखेर सुटका करण्यात आली. हा निर्णय जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशाचे गृह सचिव शालिन काब्रा यांनी शुक्रवारी जाहीर केला.हिनाभरापूर्वी काश्मीरचा दौरा करण्याची परवानगी मिळाली होती.

श्रीनगर : गेल्या सात महिन्यांपासून नजरकैदेत असलेले जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांची शुक्रवारी अखेर सुटका करण्यात आली. त्यांच्यावर सार्वजनिक सुरक्षा कायद्यान्वये (पीएसए) केलेली कारवाई मागे घेण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून काश्मीरच्या माजी मुख्यमंत्र्यांना सोडून देण्याचे आवाहन केले होते. 

जम्मू-काश्मीरला असलेला विशेष दर्जा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने गेल्या वर्षी ५ ऑगस्ट रोजी घेतला. त्या दिवसापासून फारुक अब्दुल्ला यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांच्यावर पीएसएच्या अन्वये १५ सप्टेंबर रोजी कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर या कारवाईला १५ डिसेंबर रोजी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. ही कारवाई मागे घेण्याचा निर्णय जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशाचे गृह सचिव शालिन काब्रा यांनी शुक्रवारी जाहीर केला. त्यानंतर फारुक अब्दुल्लांची नजरकैदेतून मुक्तता करण्यात आली. 

यावर रॉ चे माजी प्रमुख ए. एस. दुलत यांनी मोठा दावा केला आहे. दुलत य़ांना काश्मीरचे एक्स्पर्ट मानले जाते. रुबिया अपहरण आणि कंधार विमान अपहरणामध्ये त्यांनीच मध्यस्थी केली होती. दुलत यांना महिनाभरापूर्वी काश्मीरचा दौरा करण्याची परवानगी मिळाली होती. त्यांना मिशन फारूकवर पाठविण्यात आले होते. असा दावा दुलत यांनी केला आहे. या दौऱ्यात ते अब्दुल्लांना भेटणार असल्याची माहिती केवळ एनएसए अजित डोवाल आणि पंतप्रधान कार्यालयाला होती. 

दुलत यांनी याची माहिती एका टीव्हीवरील मुलाखतीमध्ये दिली आहे. त्यांनी सांगितले की फारुक यांना श्रीनगरमध्ये भेटलो. ते खूप थकलेले दिसत होते. काश्मीर दौरा खासगी होता. मात्र, विमानतळावर दुलत यांना नेण्यासाठी आयबीचे अधिकारी आले होते. त्यांनीच दुलत यांना अब्दुल्लांच्या घरी सोडले. 9 फेब्रुवारीला गृह मंत्रालयाने फोन करून काश्मीरचा दौर करण्याची परवानगी दिली होती. काश्मीरवरून परतल्यानंतर गृह मंत्रालयातून पुन्हा फोन आला होता. त्यावेळी त्यांनी मुलाखतीबाबत विचारले होते. माझ्या या भेटीनंतरच महिन्याभराने अब्दुल्लांची सुटका करण्यात आल्याचा दावा दुलत यांनी केला आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरSharad Pawarशरद पवारFarooq Abdullahफारुख अब्दुल्लाHome Ministryगृह मंत्रालय