मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 17:05 IST2025-08-06T17:03:59+5:302025-08-06T17:05:57+5:30
बिहारमधील मतदार यादीतून वगळण्यात आलेल्या मतदारांवरुन निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. आयोगाकडून कोर्टाने या मतदारांची माहिती मागवली आहे.

मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
निवडणूक आयोगाने ( Election Commison ) बिहारमधील ६५ लाख मतदारांची नावे वगळली आहेत. या मतदारांची माहिती तीन दिवसांत सर्वोच्च न्यायालयाने सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला आज दिले. ६५ लाख मतदारांची माहिती ९ ऑगस्ट, शनिवारपर्यंत सादर करण्यास सांगितले. न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती उज्जल भुईयान आणि न्यायमूर्ती एन. कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठाने निवडणूक आयोगाच्या वकिलांना काढून टाकलेल्या ६५ लाख मतदारांची माहिती सादर करण्यास आणि त्याची एक प्रत 'असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स' या स्वयंसेवी संस्थेला देण्यास सांगितले.
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
बिहारमधील निवडणूक आयोगाच्या २४ जूनच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या या स्वयंसेवी संस्थेने निवडणूक आयोगाला सुमारे ६५ लाख वगळलेल्या मतदारांची नावे प्रकाशित करण्याचे निर्देश देण्याची विनंती करणारा एक नवीन अर्ज दाखल केला होता. या याचिकेत ADR ने ज्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत त्यांच्या तपशीलांमध्ये ते मतदार मृत आहेत का, कायमचे स्थलांतरित झाले आहेत का किंवा इतर कोणत्याही कारणास्तव त्यांची नावे विचारात घेतली गेली नाहीत का हे देखील नमूद केले पाहिजे, अशी मागणी याचिकेत केली होती.
कोर्टाने काय सांगितले?
एडीआरच्या वतीने उपस्थित असलेले वकील प्रशांत भूषण यांना खंडपीठाने ( Supreme Court ) सांगितले की, नावे काढून टाकण्याचे कारण नंतर सांगितले जाईल कारण ती सध्या फक्त एक मसुदा यादी आहे. यावर भूषण यांनी 'काही राजकीय पक्षांना काढून टाकलेल्या मतदारांची यादी देण्यात आली आहे, परंतु त्यांनी स्पष्ट केलेले नाही की सदर मतदार मृत आहे की स्थलांतरित झाला, असा युक्तिवाद त्यांनी केला.
प्रत्येक मतदारांसोबत संपर्क करणार
खंडपीठाने निवडणूक आयोगाच्या वकिलांना सांगितले की, "आम्ही प्रभावित झालेल्या प्रत्येक मतदाराशी संपर्क साधू आणि आवश्यक माहिती मिळवू. निवडणूक आयोगाने शनिवारपर्यंत उत्तर दाखल करा आणि श्री भूषण यांना ते पाहू द्या, मग आम्ही पाहू की काय उघड झाले आहे आणि काय नाही, असंही कोर्टाने सांगितले.