शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
2
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
3
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
4
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
5
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
6
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
7
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
8
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
9
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
10
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
11
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
12
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
13
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
14
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
15
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
16
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
17
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
18
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
19
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
20
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं

राहुल गांधींशी नाव जोडल्या गेलेल्या अदिती सिंह आहेत तरी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2018 1:06 PM

अदिती सिंह नुकत्याच आपल्या कुटुंबीयांसह गांधी परिवाराचे निवासस्थान असलेल्या 10 जनपथ येथे गेल्या होत्या.

मुंबई: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भावी पत्नी म्हणून अचानक प्रसिद्धीझोतात आलेल्या काँग्रेस आमदार अदिती सिंह यांची सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता अनेकांच्या मनात अदिती यांच्याबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे. अदिती सिंह नुकत्याच आपल्या कुटुंबीयांसह गांधी परिवाराचे निवासस्थान असलेल्या 10 जनपथ येथे गेल्या होत्या. तेव्हा राहुल गांधींसोबत टिपण्यात आलेले त्यांचे छायाचित्र चर्चेसाठी निमित्त ठरले. तेव्हापासून राहुल गांधी आणि त्यांचं लग्न ठरल्याच्या बातम्या कानावर पडत होत्या. यापूर्वी अदिती सिंह उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्यावेळी चर्चेत  आल्या होत्या. पहिल्यांदाच निवडणुकीला उभ्या राहिलेल्या अदिती सिंह यांनी रायबरेली मतदारसंघातून 50 हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला होता. यापूर्वी आदित्य यांचे वडील अखिलेश सिंह रायबरेलीतून पाचवेळा विधानसभेवर निवडून गेले होते. त्यामुळे उत्तर प्रदेशातील सामर्थ्यशाली राजकारण्यांमध्ये त्यांची गणना होते. अदिती सिंह यांनी ड्यूक विद्यापीठातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर अमेरिकेत जाऊन त्यांनी पुढील शिक्षण घेतले होते. आदिती सिंह या 29 वर्षांच्या असून प्रियांका गांधी यांच्या जवळच्या वर्तुळातील मानल्या जातात. उत्तर प्रदेशातील मोदी लाटेतही अदिती यांनी 90 हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवल्यामुळे पक्षाला त्यांच्याकडून भविष्यात अनेक आशा आहेत. त्यामुळेच राहुल गांधी यांच्या तरूण नेत्यांच्या टीममध्ये अदिती सिंह यांना स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस