कुजबूज : सुशांत कुंकळयेकर
By Admin | Updated: August 8, 2015 00:23 IST2015-08-08T00:23:49+5:302015-08-08T00:23:49+5:30
आधुनिक गांधी

कुजबूज : सुशांत कुंकळयेकर
आ ुनिक गांधीअभियंता मारहाण प्रकरणी सध्या तुरुंगात सहा महिन्यांची शिक्षा भोगणारे नुवेचे आमदार मिकी पाशेको यांना कुठल्याही प्रकारे शिक्षेत माफी द्यावी यासाठी गोवा सरकारने चंग बांधला आहे. पाशेकोंना शिक्षेत माफी मिळावी यासाठी मंत्रिमंडळाने राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्याकडेही शिफारस केली आहे. मात्र, सिन्हा यांनी अजून या शिफारसीला प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे आता या मंत्रिमंडळाने म्हणे आणखी एक नवीन कारण या शिक्षा माफीसाठी पुढे काढायचे ठरविले आहे. पाशेको यांना नुवे मतदारसंघात स्वच्छ भारत अभियानाखाली आठ तास रस्ते झाडायची आणि त्याव्दारे समाजकार्य करायची अट घालून ही माफी द्यावी यासाठी म्हणे नवा प्रस्ताव तयार करायचे ठरविले आहे. एकूण काय की गोवा सरकार आता मिकी पाशेकोंनाही गांधीच्या अवतारात नुवेत उतरवू पाहात आहे असे वाटते. फरक एवढाच की ते गांधी एका गालावर कुणी थप्पड दिल्यास दुसरा गाल पुढे करायचे. मात्र, हे आधुनिक गांधी दुसर्याच्या गालावर थप्पड बिनदिक्कत ठेवून देण्यातले आहेत.आ दत्तगुरू, मुझे मार!आ बैल मुझे मार याच धर्तीवर सध्या पोलीस कोठडीत स्थानबद्ध असलेले चर्चिल आलेमाव मनातल्या मनात ‘आ दत्तगुरू, मुझे मार’ असे म्हणत असावेत. या मागचे कारण असे की, जैका लाचखोरी प्रकरणात तपास करणारे पोलीस निरीक्षक दत्तगुरू सावंत यांनी चर्चिलच्या जवळपास ‘कानात घालून’ म्हणतात कशी अटक केली. वास्तविक सावंत यांनी चर्चिल आलेमाव यांना गुरुवारी सकाळी 9 वाजता आपल्याला भेटा, तुमच्याशी मला काही तरी बोलायचे आहे, असे सांगितले होते; पण बेफिकीर राहिलेल्या चर्चिलने मी सध्या आगशीला आहे. तुम्हाला बोलायचे असेल तर तुम्ही तिथे या, असे आमंत्रण सावंत यांना दिले आणि तेही रात्री 10.30 च्या सुमारास. चर्चिलच्या सर्मथकांच्या दाव्याप्रमाणे सावंत यांना त्या ठिकाणी आणण्यासाठीही आलेमाव यांनीच आपली स्वत:ची गाडी पाठविली होती. हा सर्व घटनाक्रम पाहिल्यास चर्चिल आता डोक्यावर हात मारून बसले आहेत तर त्यात काही नवल नाही.