कुजबूज
By Admin | Updated: September 3, 2015 23:05 IST2015-09-03T23:05:41+5:302015-09-03T23:05:41+5:30
अधिकार्यांचाही यू टर्न?

कुजबूज
अ िकार्यांचाही यू टर्न?म्हापशातील मार्केटमध्ये चतुर्थीला फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घालणारा निर्णय बार्देस तालुक्यातील उपजिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत झाला. चतुर्थीच्या बाजाराला लोकांची होणारी गर्दी व त्यांची सुरक्षा लक्षात घेवून निर्णय योग्य होता. पालिकेनेही मागील आठ वर्षे दुकाने थाटण्यास परवानगी न देता बेकायदा थाटलेल्या दुकानांवर कारवाई केली नव्हती. निर्णयामुळे दबावाखाली आलेल्या उपजिल्हाधिकार्यांवर वरिष्ठ पातळीवरून सध्या प्रचंड दबाव आणला आहे. दबावाला बळी पडून फटाके विक्रेत्यांना परवानगी देण्याचे किंवा त्यांचे नव्या जागेत स्थलांतराच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे यू टर्न मारणार्या सरकार नंतर सरकारातील अधिकारीही यू टर्न मारायला लागले की काय असे वाटते. बनाके क्यों बिघाडा रे..आमदाराविकासाच्या नावावर नवीन बांधकाम करायला निविदा काढायच्या. काढलेल्या निविदानंतर बांधकाम करायचे. केलेल्या बांधकामावर परत आक्षेप आणायचा. आणलेल्या आक्षेपानंतर निविदा वाढवून नव्याने बांधकाम करून ते पूर्ण करायचे असा प्रकार सरकारी कंत्राटदार सर्रास करतात. मिलीभगतशिवाय असे प्रकार अशक्य. असाच प्रकार हळदोण्यात घडला. येथील सेंट थॉमस गल्र्स हायस्कूलसमोर या वर्षाच्या सुरुवातीला चांगल्या प्रकारची फुटपाथ बांधले होते. या फुटपाथमुळे हायस्कूलमध्ये पाल्यांना नेण्यास येणार्या पालकांना फायदा व्हायचा. रस्त्यावरून जाणार्या वाहनांवर तेथील लोकांचा अडथळा होत नव्हता; पण काय झाले कोणास ठाऊक. फुटपाथवरील पेव्हर्स सुमारे दोन महिन्यांपूर्वी अचानक काढून टाकले. केलेले काम बिघडून टाकले तसेच इतरांनाही त्याचा त्रास झाला. आमदाराच्या येथील कार्यालयासमोरच हा पराक्रम केला.