मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 17:11 IST2025-11-04T17:11:19+5:302025-11-04T17:11:47+5:30
Tamil Nadu News: तामिळनाडूमधील तिरुवन्नामलाई जिल्ह्यातील का प्राचीन शिव मंदिराच्या जीर्णोद्धारादरम्यान, मौल्यवान खनिजा सापडला आहे. येथे खोदकाम करत असलेल्या कामगारांना मातीच्या एका कलशामध्ये ठेवलेल्या १०० हून अधिक सुवर्णमुद्रा सापडल्या. ही घटना जव्वादू पर्वताजवळ असलेल्या कोविलूर या गावातील आहे.

मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...
तामिळनाडूमधील तिरुवन्नामलाई जिल्ह्यातील का प्राचीन शिव मंदिराच्या जीर्णोद्धारादरम्यान, मौल्यवान खनिजा सापडला आहे. येथे खोदकाम करत असलेल्या कामगारांना मातीच्या एका कलशामध्ये ठेवलेल्या १०० हून अधिक सुवर्णमुद्रा सापडल्या. ही घटना जव्वादू पर्वताजवळ असलेल्या कोविलूर या गावातील आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मंदिराच्या मुख्य गर्भगृहामध्ये दुरुस्तीचं काम सुरू होतं. त्यावेळी कामागारांना खोदकाम करत असताना मातीखाली दबलेला एक मातीचं एक मडकं मिळालं. हे मडकं उघडल असता त्यामध्ये सोन्याची १०३ जुनी नाणी सापडली. हे मडकं उघडलं असता त्यामध्ये सोन्याची १०३ जुनी नाणी होती. याची माहिती त्वरित पोलिसांना देण्यात आली.
पोलूर पोलीस ठाण्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, हे मंदिर शेकडो वर्षे जुने आहे. तसेच याचं बांधकाम चोल सम्राट राजराजा चोलन तृतीय याच्या काळात झालं होतं. मंदिरामध्ये सुरू असलेल्या जीर्णोद्धाराच्या कामादरम्यान, हा ऐतिहासिक शोध समोर आला.
घटनेची माहिती मिळताच महसूल विभाह आणि हिंदू धार्मिक आणि धर्मार्थ निधी विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी नाणी आपल्या ताब्यात घेत तपास सुरू केला. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी कुठलाही गुन्हा नोंदवलेला नाही.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या सोन्याच्या नाण्यांची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि कालखंडाची माहिती घेण्यासाठी तज्ज्ञांची एक टीम बनवण्यात येत आहे. ही नाणी चोल राजवटीच्या काळातील असू शकतात, असा एक अंदाज आहे.