शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

भारतातील सर्वात स्वच्छ रेल्वे कोणती? 200 रेल्वेगाड्यांची होणार तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 16:18 IST

प्रिमियर ट्रेनच्या 72 जोड्यांबरोबर इतर 128 गाड्यांचीही तपासणी होणार आहे. यामध्ये इंटरसिटी एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, संपर्क क्रांती आणि इतर लांब पल्ल्याच्या गाड्यांचा समावेश आहे.

नवी दिल्ली- भारतीय रेल्वे अधिकाधिक स्वच्छ होण्यासाठी आता 200 रेल्वेगाड्यांची तपासणी केली जाणार आहे. शताब्दी एक्स्प्रेस, राजधानी एक्स्प्रेस, दुरांतो गाड्यांचा यामध्ये समावेश असेल. या सर्वेक्षणात शौचालये, स्वच्छतेची पातळी, कापडाची गुणवत्ता, स्वच्छतेसाठी वापरले जाणारी रसायने यांचीही पाहणी केली जाणार आहे. यापुर्वी रेल्वे स्थानकांचा पाहणी करुन झाली आहे. आता रेल्वेगाड्यांची तपासणी करुन स्वच्छतेबाबत काळजी घेतली जाणार आहे.प्रिमियर ट्रेनच्या 72 जोड्यांबरोबर इतर 128 गाड्यांचीही तपासणी होणार आहे. यामध्ये इंटरसिटी एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, संपर्क क्रांती आणि इतर लांब पल्ल्याच्या गाड्यांचा समावेश आहे. प्रत्येक मेल किंवा एक्सप्रेस गाड्यांमधील 60 प्रवाशांकडून स्वच्छतेबाबतचे मत घेतले जाईल तर प्रिमियर गाडीतील 100 लोकांकडून माहिती घेतली जाईल.प्रवाशांकडून माहिती घेतल्यावरही ट्रेनमधील स्वच्छतेची व्यवस्था काटेकोरपणे तपासली जाईल. तसेच ऑन बोर्ड हाऊसकिपिंग सर्विस म्हणजे रेल्वेमध्ये स्वच्छतेसाठी नेमण्यात आलेल्या लोकांच्या कामाची गुणवत्ताही तपासली जाईल.रेल्वेचा वाढणार वेग, अॅल्युमिनियम कोचचे होणार रायबरेलीत उत्पादन भारतामध्ये प्रथमच रायबरेलीतील मॉडर्न कोच फॅक्टरी येथे वजनाने अत्यंत हलके आणि टिकाऊ असे रेल्वे कोच बनवले जाणार आहेत. हे कोच अॅल्युमिनियमपासून तयार केले जाणार आहेत. पुढील आर्थिक वर्षामध्ये हे डबे भारतामध्ये वापरले जाण्याची शक्यता आहे.पोलादी डब्यांच्या तुलनेत हे कोच वजनाने हलके असून कमी ऊर्जेच्या मदतीने खेचले जाऊ शकताच यामुळे रेल्वेची गतीही वाढवली जाऊ शकते. रेल्वेच्या आधुनिकीकरण मोहिमेत या नव्या डब्यांची निर्मिती केली जाणार आहे. दिल्ली मेट्रोसाठीही अॅल्युमिनियम कोचेसचा वापर केला गेला आहे. मॉडर्न कोच फॅक्टरीने या अॅल्युमिनियम कोचचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे दिला असून त्यांच्या मंजुरीनंतर उत्पादन सुरु होईल. यासाठी जपान किंवा युरोपातून तंत्रज्ञान आणले जाईल. त्यासाठी भारतीय तज्ज्ञांचे शिष्टमंडळ या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये युरोपमध्ये भेट देऊन आले आहे. गेल्या 15 वर्षांपासून युरोपमधील काही देश आणि जपान या डब्यांचा वापर करत आहेत.मॉडर्न कोच फॅक्टरीने वर्षाला 250 कोच बनवण्याचा प्रस्ताव सादर केला आहे तर रेल्वे बोर्डाने वर्षाला 500 कोच बनवण्यासाठी प्रकल्प अहवाल बनवण्याचे सुचवले आहे. सध्या भारताकडे त्याचे तंत्रज्ञान नसल्यामुळे सुरुवातील या कोचची किंमत अधिक असेल.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेpiyush goyalपीयुष गोयल