शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 08:47 IST

सरकारने गंभीर गुन्हेगारी प्रकरणांमध्ये आरोपी असलेल्या नेत्यांवर कारवाई करण्यासाठी तीन विधेयके तयार केली आहेत.

केंद्रातील मोदी सरकार बुधवारी लोकसभे तीन महत्वाची विधेयके सादर करणार आहे. यात, पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री अथवा कुठल्याही राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील मंत्री, यांना गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्याच्या आरोपाखाली सलग 30 दिवसांसाठी अटक अथवा ताब्यात ठेवल्यास पदावरून हटवण्यची तरतूद आहे.

खरे तर, सध्या कुठल्याही कायद्यात, अटक अथवा न्यायालयीन कोठडीसारख्या परिस्थितीत एखाद्या नेत्याला त्यांच्या पदावरून हटवता येईल, अशी कुठलीही तरतूद नाही. याच उणीवा दूर करण्यासाठी, सरकारने गंभीर गुन्हेगारी प्रकरणांमध्ये आरोपी असलेल्या नेत्यांवर कारवाई करण्यासाठी तीन विधेयके तयार केली आहेत.

ही तीन विधेयके कोणती ? - केंद्र सरकार बुधवार जी विधेयके सादर करणार आहे, त्यांत केंद्रशासित प्रदेश सरकार (दुरुस्ती) विधेयक २०२५, संविधान (एकशे तीसवी दुरुस्ती) विधेयक २०२५ आणि जम्मू-काश्मीर पुनर्रचना (दुरुस्ती) विधेयक २०२५ यांचा समावेश आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लोकसभेत यासंदर्भातील प्रस्ताव मांडतील.

वरील पैकी संविधान दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठी संसदेत विशेष बहुमताची आवश्यकता असेल. तर इतर दोन विधेयके साध्या बहुमतानेही मंजूर करता येऊ शकतात.

या विधेयकांसंदर्भात सरकारचे म्हणणे काय ? -या विधेयकांसंदर्भात सरकारचे म्हणणे आहे की, संवैधानिक नैतिकता आणि सुशासन राखण्यासाठी हे पाऊल आवश्यक आहे. तसेच, जर एखादा लोकप्रतिनिधी गंभीर गुन्ह्यांच्या आरोपाखाली तुरुंगात असेल, तर तो जनतेच्या विश्वासाला तडा पोहोचवू शकतो, असेही विधेयकांच्या प्रस्तावात म्हणण्यात आले आहे.  

टॅग्स :lok sabhaलोकसभाParliamentसंसदAmit Shahअमित शाहNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडीBJPभाजपा