Rahul Gandhi on EC:काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आजपासून(दि.१७) बिहारमध्ये 'मतदार हक्क यात्रा' सुरू केली आहे. मतदार यादीतील अनियमिततेबाबत सासाराम येथून सुरू झालेली यात्रा सुमारे १६ दिवस चालणार आहे. या यात्रेत राज्यातील २५ जिल्हे व्यापले जातील. या यात्रेत तेजस्वी यादव आणि डाव्या पक्षांचे नेतेही राहुल यांच्यासोबत सामील झाले आहेत. दरम्यान, यात्रा सुरू होण्यापूर्वी राहुल गांधींनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.
महाराष्ट्रात १ कोटी मतदार निर्माण केलेसासाराम येथील जाहीर सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, "भाजप-आरएसएस संविधान मिटवण्याचा प्रयत्न करत आहे. जिथे जिथे निवडणुका होतात, तिथे तिथे त्यांचा विजय होतो. आम्ही थोडी चौकशी केली, तेव्हा आम्हाला आढळले की, महाराष्ट्रात निवडणूक आयोगाने जादूने १ कोटी मतदार निर्माण केले. जिथे जिथे नवीन मतदार आले, तिथे तिथे भाजप युती जिंकली. भाजपला सर्व नवीन मतदारांकडून मते मिळाली."
बिहारमध्ये मत चोरीची तयारी"निवडणूक आयोगाने माझ्याकडून प्रतिज्ञापत्र मागितले, मात्र ते भाजपला विचारत नाहीत. जेव्हा आम्ही सीसीटीव्ही मागितले, तेव्हा त्यांनी नकार दिला. लोकसभा-विधानसभेच्या मतांची चोरी होत आहे. बिहारमध्येही ते मतदारांना विभागून मतांची चोरी करण्याची तयारी करत आहेत. मात्र, आम्ही त्यांना हे करू देणार नाही. बिहारचे लोकही त्यांना हे करू देणार नाहीत. निवडणूक आयोग काय करत आहे, हे संपूर्ण देशाला माहिती आहे. निवडणूक आयोग कसे चोरी करते, हे आम्ही सर्वांना दाखवून दिले आहे," अशी टीकाही राहुल गांधींनी यावेळी केली.
आम्ही ५०% आरक्षणाची भिंत तोडू राहुल गांधींनी यावेळी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणतात, "आम्ही संसदेत म्हटले होते की, आम्हाला देशात जातीय जनगणना करावी लागेल, तसेच ५०% आरक्षणाची भिंतही तोडावी लागेल. भाजप आणि नरेंद्र मोदी दबावाखाली आले आणि जातीय जनगणना जाहीर केली. पण, पंतप्रधान मोदी जातीय जनगणना योग्यरित्या करणार नाहीत. कारण त्यांचे सत्य समोर येईल. काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडी जातीय जनगणना करेल आणि ५०% आरक्षणाची भिंत तोडेल," असा दावा त्यांनी केला.
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर