यावेळी राहुल गांधी कुठून लढणार निवडणूक? उत्तर प्रदेश काँग्रेस अध्यक्षांनी केली मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2023 16:52 IST2023-08-18T16:51:19+5:302023-08-18T16:52:01+5:30
अजय राय म्हणाले, राहुल गांधी यांनी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत जो प्रेमाचा संदेश दिला आहे, खर्गे आणि आमच्या नेत्या प्रियंका गांधी यांचा जो संदेश आहे, तो काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्ये घरो घऱी पोहोचवतील.

यावेळी राहुल गांधी कुठून लढणार निवडणूक? उत्तर प्रदेश काँग्रेस अध्यक्षांनी केली मोठी घोषणा
उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर अजय राय पहिल्यांदाच वाराणसीत लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले होते. येथे पोहोचताच हजारो कार्यकर्त्यांनी अजय राय यांचे ढोल, ताशा आणि हारासह स्वागत केले. यावेळी, राहुल गांधी अमेठीतून निवडणूक लढणार का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता.
अमेठीतून निवडणूक लढणार राहुल गांधी?
यावेळी, राहुल गांधी अमेठीतून निवडणूक लढणार का? असा प्रश्न विचारला असता अजय राय म्हणाले, बिल्कुल लढतील. अमेठीचे लोकही येथे आले आहेत. प्रियंका गांधी जेथून म्हणतील, आम्ही त्यांचे पूर्ण समर्थन करू. यावेळी स्मृती ईरानी यांच्यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, त्या म्हणाल्या होत्य की, कमळाचे बटन दाबा, 13 रुपये किलो साखर मिळेल. त्या देऊ शकल्या?
अजय राय म्हणाले, या राज्यातील सर्वात मोठा मुद्दा आहे बेरोजगारीचा, महागाईचा आणि लोकांना घाबरवून आपल्या सोबत घेण्याचा. ते लोकांना ED, CBI चा धाक दाखवून वातावरण तयार करत आहेत. अजय राय म्हणाले, राहुल गांधी यांनी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत जो प्रेमाचा संदेश दिला आहे, खर्गे आणि आमच्या नेत्या प्रियंका गांधी यांचा जो संदेश आहे, तो काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्ये घरो घऱी पोहोचवतील.