operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 17:32 IST2025-05-07T17:31:53+5:302025-05-07T17:32:19+5:30

Operation Sindoor Videos: भारताने पाकिस्तानातील तब्बल ९ दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केली. २५ मिनिटांच्या हल्ल्यात या जागा अवशेषापुरत्याच राहिल्या आहेत. याचे व्हिडीओ आता समोर आले आहेत. 

Where the bloody conspiracy was hatched in India; Those places have been reduced to ruins; Watch the video | operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ

operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ

Operation Sindoor Video Footage: लश्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद, हिजबुल मुजाहिद्दीन यासारख्या जगभरात कुख्यात असलेल्या दहशतवादी संघटनांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानाला भारताने धडा शिकवला. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर दहशतवादी तयार करणारे कारखान्यांचा भारताने उद्ध्वस्त करून टाकलं. या लष्करी कारवाईचे व्हिडीओही आता भारतीय लष्कराने प्रसिद्ध केले आहेत. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

भारतीय लष्कराने ज्या नऊ दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले, त्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यात काही ठिकाणे हे जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे आहेत. तर काही हिजबूल मुजाहिद्दी, लश्कर तोयबा यांची आहेत. 

भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईचे व्हिडीओ बघा

जैश ए मोहम्मदच्या या ठिकाणांवर हवाई हल्ले

भारतीय लष्कराने जैश ए मोहम्मदचे बहावलपूर येथील मुख्यालयच जमीनदोस्त केले. त्याचबरोबर मुजफ्फराबादमधील सईदाना बिलाल कॅम्पही उद्ध्वस्त करण्यात आला. सरजल तेहरा कलान या ठिकाणाचाही यात समावेश आहे. कोटलीतील मरकज अब्बास हा अड्डाही उडवण्यात आला.

मुरीदके येथील लश्कर ए तोयबाचा मरकज तोयबा हे ठिकाणही उद्ध्वस्त करण्यात आले. त्याचबरोबर बरनालामधील मरकज अहले हदीथ, मुजफ्फराबादमधील शवाई नल्ला कॅम्पही उडवण्यात आला.    
 

भारतीय लष्कराने उद्ध्वस्त केलेल्या दहशतवादी ठिकाणांमध्ये सियालकोटमधील हिजबूल मुजाहिद्दीनचा मेहमूना जोया, कोटलीतील मसकर रशील शहीद यांचा समावेश आहे.

Web Title: Where the bloody conspiracy was hatched in India; Those places have been reduced to ruins; Watch the video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.