शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

कहॉं हैं अच्छे दिन? अण्णा हजारे यांचा खोचक सवाल

By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST

पुणे : निवडणूकीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकपाल विधेयकासह काळा पैसा भारतात आणण्यापासून शेतक-यांच्या हितासाठी सर्वोतोपरी निर्णय घेतले जातील, असे जनतेला आश्वासन दिले, पण नऊ महिन्यात कोणतीही पावले उचलली गेली नाहीत. एकप्रकारे मोदी सरकारने जनतेची दिशाभूल केली आहे. त्यामुळे हे सरकारही कॉग्रेससारखेच असून, त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. कहॉं हैं अच्छे दिन? असा खोचक सवाल उपस्थित करीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मोदी सरकारवर टिकास्त्र सोडले.

पुणे : निवडणूकीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकपाल विधेयकासह काळा पैसा भारतात आणण्यापासून शेतक-यांच्या हितासाठी सर्वोतोपरी निर्णय घेतले जातील, असे जनतेला आश्वासन दिले, पण नऊ महिन्यात कोणतीही पावले उचलली गेली नाहीत. एकप्रकारे मोदी सरकारने जनतेची दिशाभूल केली आहे. त्यामुळे हे सरकारही कॉग्रेससारखेच असून, त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. कहॉं हैं अच्छे दिन? असा खोचक सवाल उपस्थित करीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मोदी सरकारवर टिकास्त्र सोडले.
पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असता पत्रकारांशी ते बोलत होते. राष्ट्र भ्रष्टाचारमुक्त होईल, असे वाटले होते पण मोदी सरकारही याबाबत कॉंग्रेसचीच नक्कल करीत आहे, आम्ही जो लोकपालचा मसुदा तयार केला होता. त्यातील पाच ते सहा मुद्दे कॉंग्रेस सरकारने वगळले आणि या विधेयकाला संसदेत मंजूर केले. त्यावर राष्ट्रपतींची सही देखील झाली. पण कॉंग्रेसच्या काळातच काय तर गेल्या नऊ महिन्यात मोदी सरकारकडून ही त्याची अमंलबजावणी झालेली नाही. काल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अण्णांना अपेक्षित असलेले लोकपाल आणण्याचे आश्वासन शपथविधी सोहळ्यात दिले आहे, त्याविषयी विचारले असता अरविंदला तसे लोकपाल आणण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी पाठिंबा देऊ असे त्यांनी सांगितले.
निवडणूकीदरम्यान शंभर दिवसात स्वीस बँंकेतील काळा पैसा भारतात आणू असे मोदींनी जाहिर केले होते, मग कुठे आहे तो पैसा? मोदी सरकारने केवळ मतांसाठी जनतेची दिशाभूल केली आहे. शेतक-यांविषयी मोठा कळवळा दाखविणा-या या सरकारने भूअधिग्रहण कायद्यामधील 70 ट्क्के शेतक-यांची जमिन देण्यासाठी मंजूरी असल्यास ती घेतली जाईल, ही तरतूदच रद्दबादल करून नवे विधेयक संसदेत मंजूर करून घेतले. उद्योजकांच्या हिताचा निर्णय घेऊन एकप्रकारे शेतक-यांचा विश्वासघातच केला आहे, त्यामुळे कहॉं हैं अच्छे दिन? अशी टिका त्यांनी केली. लोकपाल विधेयकाची अंमलबजावणी, काळा पैसा आणि भूअधिग्रहण कायदा या मुद्यांवरच येत्या 24 फेबृवारीपासून दिल्लीमध्ये आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. या आंदोलनात कुणीही सहभागी होऊ शकेल. अगदी मुख्यमंत्री केजरीवालसुद्धा. मात्र पक्षाचा झेंडा, बँनर आणि व्यासपीठ याचा उपयोग कोणालाही करता येणार नाही. असेही त्यांनी स्पष्ट केले.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------