शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 17:16 IST

Amit Shah Reaction On Indus Water Treaty : "आंतरराष्ट्रीय करार एकतर्फी रद्द करणे सोपे नसते. मात्र, आम्हाला तो स्थगित करण्याचा अधिकार होता आणि आम्ही तेच केले..."

भारताने सिंधू पाणी करार कायमचा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. हा करार आता पु्न्हा पूर्ववत होणे नाही. पाकिस्तानने या कराराच्या अटींचे उल्लंघन केले आहे. यामुळे आता त्याला पूर्वी जे पाणी मिळत होते, ते मिळणार नाही. असे केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी स्पष्ट केले आहे.

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सिंद्धू पाणी करारासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना शाह म्हणाले, "हा करार आता कधीही पूर्ववत होणार नाही. आंतरराष्ट्रीय करार एकतर्फी रद्द करणे सोपे नसते. मात्र, आम्हाला तो स्थगित करण्याचा अधिकार होता आणि आम्ही तेच केले. हा करार भारत आणि पाकिस्तान यांच्या शांतीच्या आणि प्रगतीच्या दृष्टीने करण्यात आला होता. मात्र, याच्या अटीच मोडल्या गेल्या, यामुळे याचे औचित्य संपले.

पहलगाम दहशतवादी हल्लायनंतर घेण्यात आली अ‍ॅक्शन - गेल्या २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मिरातील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात २६ पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला होता. यामुळे भारतात प्रचंड संतापाची आणि दुःखाची लाट होती. चानंतर लगेचच भारताने सिंधू पाणी करार तात्काळ प्रभावाने स्थगित केला आणि पाकिस्तानी नागरिकांना देशाबाहेर काढण्यासारखे अनेक राजकीय निर्णयही घेतले होते.पहलगाम हल्ल्याचा निषेध करत काय म्हणाले अमित शाह? -केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पहलगाम हल्ल्याचा निषेध करत म्हणाले, काश्मीरमधील शांतता भंग करण्याचे आणि तरुणांची दिशाभूल करण्याचे हे षड्यंत्र होते. पहलगाम हल्ला काश्मीरमधील वाढते पर्यटन थांबवण्यासाठी आणि तरुणांना विकासाच्या मार्गावरून भरकटवण्यासाठी जाणूनबुजून करण्यात आला होता. मात्र, खोऱ्यातील लोक आता पूर्वीच्या तुलनेत भारतासोबत उभे आहेत," असेही शाह म्हणाले.   

टॅग्स :Amit Shahअमित शाहPakistanपाकिस्तानWaterपाणीPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूर