जेव्हा अतिउत्साही कार्यकर्त्यानं घेतलं राहुल गांधीचं चुंबन...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2019 16:59 IST2019-08-28T16:59:03+5:302019-08-28T16:59:07+5:30

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी सध्या आपल्या वायनाड मतदारसंघाच्या दौऱ्यावर असून आज वायनाडमधील पूरग्रस्तांची भेट घेऊन विचारपूस केली.

When A Man Kiss Congress MP Rahul Gandhi During His Wayanad Visit | जेव्हा अतिउत्साही कार्यकर्त्यानं घेतलं राहुल गांधीचं चुंबन...

जेव्हा अतिउत्साही कार्यकर्त्यानं घेतलं राहुल गांधीचं चुंबन...

वायनाड: काँग्रेसचे खासदार राहुल गांधी सध्या आपल्या वायनाड मतदारसंघाच्या दौऱ्यावर असून आज वायनाडमधील पूरग्रस्तांची भेट घेऊन विचारपूस केली. मात्र यावेळी राहुल गांधी विचारपूस करुन गाडीत बसत असताना त्यांच्यासोबत एक अनपेक्षित प्रकार घडल्याचे समोर आले.

राहुल गांधी वायनाड मधील रहिवाशांची विचारपूस झाल्यानंतर गाडीतून जात होते. त्यावेळी अनेक कार्यकर्ते त्यांना हात मिळवण्यासाठी धडपड करत होते. मात्र यावेळी एका अतिउत्साही कार्यकर्त्याने राहुल गांधींना थेट चुंबन घेण्याचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल झाला आहे.

राहुल गांधी केरळ मधील आपल्या वायनाड मतदारसंघात चार दिवसांच्या दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करत तेथील विविध समस्या सोडविण्याचे त्यांनी रहिवाशांना आश्वासन दिले आहे. 

Web Title: When A Man Kiss Congress MP Rahul Gandhi During His Wayanad Visit