शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

मॉब लिंचिंगचा कायदा कधी? औवेसींचा अमित शहांना 'आजचा सवाल' ?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 5:00 PM

लोकसभा सभागृहात राष्ट्रीय सुरक्षा सुधारणा विधेयकाच्या चर्चेवेळी खासदार असुदुद्दीन औवेसी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या खडाजंगी पाहायला मिळाली होती.

ठळक मुद्देलोकसभा सभागृहात राष्ट्रीय सुरक्षा सुधारणा विधेयकाच्या चर्चेवेळी खासदार असुदुद्दीन औवेसी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या खडाजंगी पाहायला मिळाली होती.एमआयएमचे खासदार असुदुद्दीन औवेसी यांनी NIA सुधारणा विधेयकासह मॉब लिंचिंगचे विधेयकही का मंजूर केले जात नाही.

नवी दिल्ली - खासदार असुदुद्दीन औवेसी यांनी संसदेत पुन्हा एकदा मॉब लिंचिंगच्या प्रश्नावरुन सरकारला धारेवर धरले आहे. गृहमंत्री अमित शहा यांना प्रश्न विचारताना, अद्याप मॉब लिंचिंगवर कायदा का केला नाही? मॉब लिंचिंगचा कायदा कधी अस्तित्वात येईल? असा प्रश्न असुदुद्दीन औवेसी यांनी लोकसभा सभागृहात विचारला. औवेसी यांनी अमित शहांना सर्वोच्च न्यायालयाचा दाखला देत, हा प्रश्न विचारला आहे.  

लोकसभा सभागृहात राष्ट्रीय सुरक्षा सुधारणा विधेयकाच्या चर्चेवेळी खासदार असुदुद्दीन औवेसी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या खडाजंगी पाहायला मिळाली होती. दहशतवादाचा मुद्द येताच मुस्लीम समाजाल लक्ष्य करण्यात येत असल्याचा आरोप करत असुदुद्दीन औवेसी यांनी सत्यपालसिंह यांच्या भाषणाला विरोध केला होता. सत्यपालसिंह यांनी आपल्या भाषणात दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करताना, हैदराबादेतून काही संशयितांना अटक करण्यात आल्याचे सांगितले. त्यावेळी, औवेसी यांनी आक्षेप घेत संसंदेत गदारोळ घातला. त्यानंतर अमित शहांनी औवेसींना भरससंदेत खडसावले होते. औवेसीजी, तुम्हाला ऐकावंच लागेल. ते काय म्हणतायेत ते तरी ऐका, अशा शब्दात शहा यांनी असुदुद्दीन औवेसींना खडसावले होते. त्यानंतर, लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात NIA म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आले आहे.

एमआयएमचे खासदार असुदुद्दीन औवेसी यांनी NIA सुधारणा विधेयकासह मॉब लिंचिंगचे विधेयकही का मंजूर केले जात नाही. मॉब लिंचिंगबाबत सरकार का कायदा करत नाही, असा प्रश्न उपस्थित केला. मला गृहमंत्र्यांना हा प्रश्न विचारायला आवडेल की, आजपर्यंत मॉब लिंचिंगसंदर्भात कायदा का झाला नाही? गेल्यावर्षीच सर्वोच्च न्यायालयाने मॉब लिंचिंगच्या कायद्याबाबत विचारणा केली होती. जर, आपण सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वच आदेशांचे पालन करता, मग या आदेशाचे का नाही? असे म्हणत औवेसी यांनी मॉब लिंचिंगच्या कायद्याची विचारणा केली आहे.  

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAmit Shahअमित शहाlok sabhaलोकसभाCrime Newsगुन्हेगारी