शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

एक दिवस असा येईल...; वाजपेयींचे 'ते' शब्द तंतोतंत खरे ठरले; २२ वर्षांपूर्वीची भविष्यवाणी चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 16:16 IST

काँग्रेस आणि भाजपबद्दल वाजपेयींनी २२ वर्षांपूर्वी केलेलं भाकीत आज खरं ठरताना दिसतंय

नवी दिल्ली: पाच राज्यांच्या निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले. या पाचपैकी चार राज्यांत भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. ती राखण्यात भाजपला यश आलं आहे. उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोव्यात आपनं बहुमत मिळवलं. उत्तर प्रदेशात गेल्या ३ दशकांपासून सत्ताधाऱ्यांचा पराभव होत आला. मात्र ही परंपरा मोडीत निघाली. उत्तराखंडच्या निर्मितीपासून राज्यात कायम भाजप, काँग्रेसला आलटून पालटून सत्ता मिळत राहिली. मात्र ही प्रथा मतदारांनी यंदा मोडीत काढली आणि भाजपला सत्तेत कायम ठेवलं. या निकालानंतर अनेकांना माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींचे दोन दशकांपूर्वीच शब्द आठवले.

आम्ही त्या क्षणाची वाट पाहू, जेव्हा आम्हाला स्पष्ट बहुमत मिळेल. आज माझी चेष्टा केली जातेय, पण एक वेळ अशी येईल, जेव्हा लोक तुमची चेष्टा करतील. दोन दशकांपूर्वी अटल बिहारी वाजपेयींचं सरकार अवघ्या एका मतानं कोसळलं होतं, त्यावेळी लोकसभेत बोलताना वाजपेयींनी त्यांच्या भावना अशा शब्दांमध्ये व्यक्त केल्या होत्या. ते शब्द आज खरे ठरताना दिसत आहे. 

काँग्रेसचे खासदार गिरधर गोमांन यांनी लोकसभेत केलेल्या मतदानानं वाजपेयी यांचं सरकार कोसळलं होतं. मात्र दोन दशकांमध्ये परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. पाच राज्यांमध्ये काँग्रेसचा धुव्वा उडाला आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाच्या झाडूनं काँग्रेसचा झाडूनं पराभव केला. त्यानंतर सोशल मीडियावर #atalbiharivajpayee ट्रेंड होऊ लागला. २०१४ मध्ये केंद्रात भाजपचं सरकार आलं. तेव्हापासून देशभरात काँग्रेसच्या पतनाची सुरुवात झाली. उत्तर प्रदेशनं काँग्रेसला अनेक दिग्गज नेते दिले. त्याच उत्तर प्रदेशात आता काँग्रेसला केवळ २.३३ टक्के मतं मिळाली. तर भाजपला ४१.२९ टक्के मतदान झालं. सत्ता असलेल्या पंजाबमध्येही काँग्रेसची धूळधाण उडाली. पंजाबमध्ये काँग्रेसला २२.९८ टक्के मतं मिळाली. तर आपनं ४२.०१ टक्के मतं मिळवत सत्ता मिळवली.

अंधेरा छटेगा, कमल खिलेगा, हे अटलबिहारी वाजपेयींचे शब्द आज खरे ठरताना दिसत आहेत. आम्ही मेहनत केली आहे. आम्ही संघर्ष केला आहे. हा ३६५ दिवस चालणारा पक्ष आहे. आम्ही केवळ निवडणुकीत दिसत नाही. आम्ही बहुमताची वाट पाहू, अशा शब्दांत वाजपेयींनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या होत्या. गेल्या ८ वर्षांत भाजपनं देशभरात जोरदार कामगिरी केली आहे. लोकसभा असो वा विधानभा निवडणुका, भाजपनं नेत्रदीपक कामगिरी केली आहे.

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीcongressकाँग्रेसBJPभाजपाUttar Pradesh Assembly Election Results 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल २०२२