नेता जातीय टिप्पणी करतो, तेव्हा देशाचे नुकसान होते : कोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 08:29 IST2026-03-28T08:28:51+5:302026-03-28T08:29:13+5:30
एका याचिकेवर सुनावणी सुरू असताना उच्च न्यायालयाने हा प्रश्न उपस्थित केला.

नेता जातीय टिप्पणी करतो, तेव्हा देशाचे नुकसान होते : कोर्ट
कोची : जेव्हा एखादा उमेदवार द्वेषपूर्ण किंवा जातीयवादी टिप्पणी करतो आणि त्यामुळे एखाद्या समुदायाचे, समाजाचे व देशाचे नुकसान होते, तेव्हा नक्की काय घडते, असा प्रश्न केरळ उच्च न्यायालयाने शुक्रवारी भारतीय निवडणूक आयोगाला विचारला.
गुरुवायूर विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार बी. गोपालकृष्णन यांनी एका व्हिडिओमध्ये कथितरीत्या जातीयवादी टिप्पणी केल्याप्रकरणी, निवडणूक आयोगाने कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप करणाऱ्या एका याचिकेवर सुनावणी सुरू असताना उच्च न्यायालयाने हा प्रश्न उपस्थित केला.
न्या. बेचू कुरियन थॉमस यांनी ही याचिका निकाली काढताना आयोगाला निर्देश दिले की, या निवेदनावर विचार करावा आणि त्याबाबत योग्य ते आदेश पारित करावेत. न्यायालयाने असेही निरीक्षण नोंदवले की, ‘आचारसंहिता’ लागू आहे या कारणास्तव संपूर्ण सरकारी यंत्रणाच ठप्प झाल्यासारखी वाटते; आणि याच सबबीखाली न्यायालयाचे अनेक निर्देश, तसेच कायदेशीर कर्तव्येदेखील पार पाडली जात नाहीत.