शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

व्हॉट्सॲपचे धोरण प्रचाराचे स्टेटस, जनजागृतीला केली सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2021 07:08 IST

नवी दिल्ली : आपल्या नव्या व्यक्तिगतता धोरणासंदर्भात (प्रायव्हसी पॉलिसी) व्हॉट्सॲपने जनजागृतीला सुरुवात केली आहे. रविवारी असंख्य व्हॉट्सॲप वापरकर्त्यांच्या स्टेटसमध्ये सर्वोच्च ...

नवी दिल्ली : आपल्या नव्या व्यक्तिगतता धोरणासंदर्भात (प्रायव्हसी पॉलिसी) व्हॉट्सॲपने जनजागृतीला सुरुवात केली आहे. रविवारी असंख्य व्हॉट्सॲप वापरकर्त्यांच्या स्टेटसमध्ये सर्वोच्च स्थानावर व्हॉट्सॲपचे बोधचिन्ह होते. त्यावर टिचकी मारल्यावर चार प्रकारची छायाचित्रे दिसून येत होती. त्या प्रत्येक छायाचित्राखाली ‘व्यक्तिगततेला प्राधान्य’ या आशयाचे संदेश प्रसारित करण्यात आले आहेत. फेसबुक ही पितृक कंपनी असलेल्या व्हॉट्सॲपने अलीकडेच ८ फेब्रुवारीपासून नवीन व्यक्तिगतता धोरण अमलात आणणार असल्याचे जाहीर केले होते. त्यातून वापरकर्त्यांच्या डेटाचा वापर व्यावसायिक कारणांसाठी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. यावर आक्षेप घेत अनेक वापरकर्त्यांनी व्हॉट्सॲपचा त्याग केला. याची गंभीर दखल घेत व्हॉट्सॲपने नव्या धोरणाची अंमलबजावणी १५ मेपर्यंत पुढे ढकलली. या सर्व पार्श्वभूमीवर वापरकर्त्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी रविवारी व्हॉट्सॲपने स्टेटस ठेवले. या स्टेटसवर टिचकी मारल्यानंतर पुढील छायाचित्रे आणि मजकूर निदर्शनास येत होता. या प्रकाराची दिवसभर सगळ्याच युझर्समध्ये चर्चा सुरु होती. 

संदेशात काय? -- पहिल्या छायाचित्रात आम्ही तुमच्या व्यक्तिगततेबाबत  कटिबद्ध आहोत, असा संदेश आहे.- दुसऱ्या छायाचित्रातील संदेशात व्हॉट्सॲप तुमचे व्यक्तिगत संदेश वाचू शकत नाही, असे म्हटले आहे.- तुम्ही इतरांना तुमच्या निवासाचे वा प्रवासाचे ठिकाण पाठविले असल्यास ते आम्ही पाहू शकत नाही, असे तिसऱ्या संदेशात स्पष्ट केले आहे.- तुमचे संपर्क क्रमांक व्हॉट्सॲप फेसबुककडे देत नाही, असा चौथा संदेश सांगतो.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपSocial Mediaसोशल मीडिया