शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅपिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
2
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
3
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
4
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
5
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
6
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
7
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
8
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
9
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
10
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
11
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
12
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
13
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
14
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
15
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
16
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
17
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
18
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
19
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
20
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट

व्हॉट्सॲप वि. सरकार, सोशल मीडिया कंपनीने केंद्राच्या नव्या नियमांना कोर्टात दिले आव्हान   

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 07:01 IST

WhatsApp Vs. Central government: गोपनीयतेच्या धोरणावरून केंद्र सरकारने व्हॉट्सॲपविरोधात दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे. व्हॉट्सॲपने आपले गोपनीयता धोरण मागे घ्यावे, असे निर्देश देत आठवडाभराची मुदतही केंद्र सरकारने दिली होती.

नवी दिल्ली : गोपनीयतेच्या धोरणावरून (प्रायव्हसी पॉलिसी) गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकार आणि व्हॉट्सॲप यांच्यात रंगलेल्या वादाने आता गंभीर रूप धारण केले आहे. केंद्राने जारी केलेल्या माहिती तंत्रज्ञानविषयक नव्या नियमांना (आयटी रूल्स) व्हॉट्सॲपने न्यायालयात आव्हान दिले असून, या नियमांचे पालन केल्यास आमच्या वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचा भंग होईल, असा युक्तिवाद केला आहे. माहिती तंत्रज्ञानविषयक नवीन नियम २६ मेपासून अमलात आले.गोपनीयतेच्या धोरणावरून केंद्र सरकारने व्हॉट्सॲपविरोधात दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे. व्हॉट्सॲपने आपले गोपनीयता धोरण मागे घ्यावे, असे निर्देश देत आठवडाभराची मुदतही केंद्र सरकारने दिली होती; मात्र व्हॉट्सॲपने गोपनीयता धोरण मागे घेण्यास आपण असमर्थ असल्याचे स्पष्ट केले होते. या दरम्यानच केंद्र सरकारचे माहिती-तंत्रज्ञानविषयक नवीन नियम अमलात आले. या नियमांची अंमलबजावणी करणे आपल्याला शक्य नाही, असे सांगत व्हॉट्सॲपने या नियमांना आव्हान देणारी याचिका दिल्ली हायकोर्टात दाखल केली. 

व्हॉट्सॲपचा युक्तिवाद- व्हॉट्सॲपवर आलेल्या संदेशाचे मूळ शोधण्यास नवे नियम भाग पाडणार आहेत. यामुळे गोपनीयतेचा भंग होणार आहे.-हे व्हॉट्सॲपवर आलेल्या प्रत्येक संदेशावर नजर ठेवण्यासारखे आहे.- यामुळे एण्ड-टू-एण्ड एन्क्रिप्टेड या आमच्या नियमाला हरताळ फासला जाईल.आमच्या सेवेची विश्वासार्हता धोक्यात येईल.- माहितीचा मूळ स्रोत किंवा उगम उघड करणे हा नियम भारतीय राज्यघटनेने दिलेल्या गोपनीयतेच्या हक्काची पायमल्ली ठरू शकेल.- आमच्या वापरकर्त्यांच्या हक्कांचे रक्षण करण्याबरोबरच सरकारच्या नियमांचे पालन करणे हेही आम्ही आमचे कर्तव्य समजतो.- नव्या नियमांसंदर्भात तोडगा काढण्यासाठी आम्ही सरकारशी चर्चा करत आहोत. 

आमच्याकडे पर्याय नव्हतायंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला माहिती-तंत्रज्ञानविषयक नवीन नियम जाहीर झाले. आमच्यासारख्या लोकप्रिय संदेशवहन ॲपवर येणाऱ्या संदेशांचे मूळ स्रोत शोधण्याबरोबरच नियमांचे अनुपालन न केल्यास फौजदारी कारवाईला सामोरे जाण्याची जोखीमही आहे. त्यामुळे यासंदर्भात न्यायालयाचे मत जाणून घेण्याशिवाय आमच्याकडे कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता म्हणून कोर्टात धाव घेतली, असे व्हॉट्सॲपच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने स्पष्ट केले. 

गोपनीयता हक्काची पायमल्ली नाही : केंद्रमाहिती तंत्रज्ञानविषयक नवीन नियमांमध्ये संदेशवहन ॲप्सना विशिष्ट संदेशांच्या मूळ उगमबाबत सरकारला अवगत करण्याची अट आहे. या अटीनुसार देशाचे सार्वभौमत्व व अखंडता धोक्यात येत असेल, सार्वजनिक कायद्यांचा भंग होत असेल अशा विविध संदेशांचे मूळ उगम ॲप्सना सरकारला सांगावे लागतील. या अटीमुळे नागिरकांच्या गोपनीयता हक्काची कुठेही पायमल्ली होत नाही, असे केंद्र सरकारतर्फे बुधवारी स्पष्ट करण्यात आले. 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपCentral Governmentकेंद्र सरकारCourtन्यायालय