...म्हणून प्ले स्टोरवरुन पतंजलीचं किंभो अॅप हटवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2018 14:47 IST2018-05-31T14:47:45+5:302018-05-31T14:47:45+5:30
रामदेव बाबांच्या पतंजलीनं कालच अॅप लॉन्च केलं होतं

...म्हणून प्ले स्टोरवरुन पतंजलीचं किंभो अॅप हटवलं
मुंबई: रामदेव बाबांच्या पतंजलीनं काल किंभो हे मेसेजिंग अॅप लॉन्च केलं होतं. एका दिवसात जवळपास 50 हजार जणांनी हे अॅप डाऊनलोड केलं होतं. मात्र आता हे अॅप गुगलच्या प्ले स्टोरवरुन हटवण्यात आलंय. किंभो अॅप डाऊनलोड केल्यानंतर अनेकांनी मोबाईन हँग होत असल्याच्या तक्रारी केल्या. त्यामुळे हे अॅप प्ले स्टोरवरुन काढून टाकण्यात आलं. मात्र ज्या व्यक्तींनी किंभो अॅप डाऊनलोड केलं होतं, त्यांना प्ले स्टोरवर अजूनही हे अॅप दिसतंय.
आता गुगल प्ले स्टोरवर किंभो अॅप सर्च केल्यास ते दिसत नाही. मात्र किंभो नावाचं एक दुसरं अॅप प्ले स्टोरवर दिसतं. ज्यांनी हे अॅप डाऊनलोड केलंय, त्यांच्या फोनवर किंभो अॅप दिसतं. ज्या लोकांनी हे अॅप डाऊनलोड करुन अनइन्स्टॉल केलंय, त्यांच्या फोनमध्येही हे अॅप दिसतंय. पतंजलीच्या अॅपमध्ये स्क्रिनवर चॅट्स, कॉन्टॅक्ट्स आणि अॅक्टिव्हिटी असे तीन टॅब देण्यात आले होते. सर्वात वर उजव्या बाजूला गियर आयकॉनमध्ये प्रोफाईल एडिट करण्याचा पर्याय देण्यात आला होता. याशिवाय सर्चमध्ये जाऊन कॉन्टॅक्ट पाहण्याची सुविधा देण्यात आली होती. अॅपच्या प्रोफाईल पेजवर जाऊन एडिट प्रोफाईलवर जाऊन नाव आणि फोटो बदलण्याचा पर्याय देण्यात आला होता. याशिवाय फोन नंबर बदलण्याचा पर्यायही दिला गेला होता.