शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

IAS, IPS सेवांमध्ये SC-ST-OBC अधिकाऱ्यांची नेमकी संख्या किती? सरकारने मांडली आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 12:30 IST

सरकारने संसदेत मांडली गेल्या पाच वर्षातील पदभरतीची आकडेवारी.

नवी दिल्ली: केंद्रीय लोकसेवा आयोगा(UPSC) मार्फत IAS, IPS आणि IFS या देशातील सर्वाधिक प्रतिष्ठित सेवांमध्ये नोकरभरती केली जाते. याद्वारे गेल्या पाच वर्षांत (2020 ते 2024) आरक्षित वर्गातील किती उमेदवारांची नियुक्ती झाली? याबाबतची माहिती समोर आली आहे. सरकारने संसदेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार, OBC, SC आणि ST वर्गातील सर्वाधिक उमेदवारांची नियुक्ती भारतीय पोलीस सेवा (IPS) मध्ये झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोणत्या प्रवर्गातून किती उमेदवारांची नियुक्ती?

राज्यसभेत कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि पेन्शन मंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी लेखी उत्तराद्वारे दिलेल्या माहितीनुसार, UPSC नागरी सेवा परीक्षा 2020 ते 2024 या कालावधीत थेट भरतीद्वारे खालीलप्रमाणे नियुक्त्या करण्यात आल्या -

IAS (भारतीय प्रशासकीय सेवा)

OBC : 245

SC : 135

ST : 67

IPS (भारतीय पोलीस सेवा)

OBC : 255

SC : 141

ST : 71

IFS (भारतीय वन सेवा)

OBC : 231

SC : 95

ST : 48

एकूण तीनही सेवांमध्ये

OBC : 731 उमेदवार

SC : 371 उमेदवार

ST : 186 उमेदवार

या आकडेवारीनुसार, IAS आणि IFS च्या तुलनेत IPS मध्ये आरक्षित वर्गातील उमेदवारांची संख्या अधिक आहे.

UPSC नोटिफिकेशनमध्ये पदांची घट

दरम्यान, UPSC मार्फत जाहीर होणाऱ्या रिक्त पदांच्या संख्येत सातत्याने घट होत असल्याचेही समोर आले आहे. 2024 : 1,056 पदे, 2025 : 979 पदे, 2026 : फक्त 933 पदे. गेल्या तीन वर्षांत जाहिरातीत येणाऱ्या पदांची संख्या कमी होत असल्याने उमेदवारांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

IAS, IPS आणि IFS मधील रिक्त पदांची स्थिती

1 जानेवारी 2025 पर्यंतच्या सिव्हिल लिस्टनुसार सेवांमधील रिक्त पदांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे 

IAS :

मंजूर पदे : 6,877

रिक्त पदे : 1,300

IPS :

मंजूर पदे : 5,099

रिक्त पदे : 505

IFS :

मंजूर पदे : 3,193

रिक्त पदे : 1,029

सर्वाधिक रिक्त पदे भारतीय वन सेवा (IFS) मध्ये असून, त्यानंतर IAS आणि IPS चा क्रम लागतो.

English
हिंदी सारांश
Web Title : SC-ST-OBC officers in IAS, IPS: Government reveals recruitment numbers.

Web Summary : Government data reveals OBC candidates lead in IPS, IAS, IFS recruitments (2020-2024). Vacancies persist, particularly in IFS. UPSC reducing positions.
टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगexamपरीक्षाSC STअनुसूचित जाती जमातीOBCअन्य मागासवर्गीय जातीParliamentसंसद