हरयाणात काय चाललंय? ASI ची गोळी झाडून आत्महत्या; दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 16:00 IST2025-10-14T15:58:38+5:302025-10-14T16:00:14+5:30
एएसआयने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर भ्रष्टाचारासह जातीयवादाचे गंभीर आरोप केले आहेत.

हरयाणात काय चाललंय? ASI ची गोळी झाडून आत्महत्या; दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप
Haryana Police:हरयाणापोलिस विभागातून आत्महत्येची आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. रोहतक येथे सायबर सेलमध्ये कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षकाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. पोलिसांना घटनास्थळावरुन तीन पानांचा सुसाईड नोट आणि एक व्हिडिओ मेसेज मिळाला आहे. मृत एएसआयने आपल्या चिठ्ठीत दिवंगत IPS अधिकारी वाय. पूरन कुमार यांच्यावर भ्रष्टाचार आणि जातीयवादाचे गंभीर आरोप केले आहेत.
घटनास्थळावर सापडले पुरावे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप लाठर यांनी आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्वरने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. पोलिसांनी घटनास्थळावरुन सुसाईड नोट आणि व्हिडिओ मेसेज फॉरेन्सिक तपासासाठी जप्त केले आहेत. तसेच, मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
#WATCH | Haryana | A body of a police personnel found under suspicious circumstances in a room built near an agricultural field in Rohtak's Ladhot village pic.twitter.com/1pUjhowsBM
— ANI (@ANI) October 14, 2025
सुसाईड नोटमध्ये काय लिहिले?
मृत एएसआयने आपल्या चिठ्ठीत लिहिले की, “मी संदीप कुमार, ग्राम जुलाना, जिल्हा जींद. मी आयुष्यभर सत्याचा मार्ग धरला. माझे आजोबा देशासाठी लढले. देशभक्ती माझ्या रक्तात आहे. मी भगतसिंग यांना माझा आदर्श मानतो, कारण त्यांनी देशाला जागवले. आज समाजात भ्रष्टाचार आणि जातिवाद या दोन गोष्टी सर्वात मोठे संकट आहेत.”
“हरियाणामध्ये अनेक आयएएस अधिकारी आणि उच्चपदस्थ भ्रष्टाचारात गुंतले आहेत. मात्र भाजप सरकारमध्ये काही प्रामाणिक अधिकारी आहेत, ज्यांनी या व्यवस्थेवर काही प्रमाणात नियंत्रण ठेवले आहे. आमचे डीजीपी साहेब प्रामाणिक आणि निर्भय व्यक्ती आहेत. सुरुवातीला मला वातावरणाशी जुळवून घेणे कठीण गेले, पण माझा विश्वास सदैव सत्यावरच होता.”
आयपीएस पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप
सुसाईड नोटमध्ये एएसआयने दिवंगत आयपीएस वाय. पूरन कुमार यांच्यावर आरोप केला की, "ते भ्रष्टाचारात सहभागी होते आणि जातिवादाच्या आधारे संपूर्ण सिस्टीमला “हायजॅक” करण्याचा प्रयत्न करत होते." एएशआयने आपल्या मृत्यूला “भ्रष्ट व्यवस्थेविरोधातील शहादत” असे म्हटले आणि या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.
🚨 HUGE twist in Haryana’s IPS Pooran case.
— The Analyzer (News Updates🗞️) (@Indian_Analyzer) October 14, 2025
~ Cyber Cell ASI Sandeep Lathar, who was probing Pooran’s suicide, has now SHOT HIMSELF.
In his note, Sandeep wrote: "Pooran was a CORRUPT officer. I martyr myself and demand justice."😳
He was investigating Pooran’s death case after… pic.twitter.com/vYamhZUlNQ
महत्त्वाच्या तपासाशी संबंधित अधिकारी
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मृत एएसआय IPS पूरन कुमार यांच्या गनमॅन सुशील कुमारशी संबंधित प्रकरणातील तपास अधिकारी होते. त्यामुळेच, या आत्महत्येमागील नेमके कारण आणि त्या तपासाचा याच्याशी काही संबंध आहे का, याचा सोध पोलिस घेत आहेत.
IPS वाय. पूरन कुमार यांचीही गोळी झाडून आत्महत्या
हरियाणा पोलीस दलातील वरिष्ठ IPS अधिकारी वाय. पूरन कुमार यांनी काही दिवसांपूर्वीच डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली आहे. घटनास्थळावर 8 पानी सुसाइड नोट मिळाली असून, त्यातून त्यांनी 8 IPS आणि 2 IAS अधिकाऱ्यांवर मानसिक त्रास दिल्याचा आणि जातीवादाचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे, त्यांनी आपल्या सुसाइड नोटमध्ये माजी DGP हरियाणा यांच्यावर सर्वाधिक गंभीर आरोप केले आहेत.
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
नोटमध्ये पूरन कुमार यांनी स्पष्टपणे नमूद केले की, त्यांच्याशी जातीवरुन भेदभाव करण्यात आला, पोस्टिंग आणि प्रमोशनमध्ये अन्याय, ACR (Annual Confidential Report) मध्ये फेरफार, सरकारी निवास नाकारला जाणे आणि त्यांच्या प्रशासकीय तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आले. या आरोपांसह “आता लढण्याची ताकद उरलेली नाही” असेही त्यांनी यात नमूद केले. सध्या हे प्रकरण तापले असून, पूरन कुमार यांच्या पत्नी आणि IAS अधिकारी अमनीत पी. कुमार यांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.