शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लंच पे चर्चा’! राज ठाकरे आईसोबत पुन्हा मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंसोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम
2
“दादा भुसेंचे ट्रम्प यांच्याशी घनिष्ट संबंध असतील, पालकमंत्रीपद...”; गिरीश महाजनांचा टोला
3
तुम्हीही होऊ शकता कोट्यधीश! विद्यार्थी, गिग वर्कर्ससाठी 'मायक्रो SIP' चा नवा सुपरहिट ट्रेंड
4
"जर तुम्ही कॉफी बनवायला शिकला असाल तर...", राहुल गांधींच्या दक्षिण अमेरिका दौऱ्यावर भाजपचा निशाणा
5
“तरे म्हणाले होते हा माणूस दगा देईल, तेच झाले, आता पश्चाताप झाला नसता”; ठाकरेंची शिंदेवर टीका
6
नोकरीच्या बचतीची चिंता सोडा! 'या' ४ सोप्या मार्गांनी घरबसल्या तपासा तुमचा PF बॅलन्स
7
Pune Crime: गर्लफ्रेंडच्या मोबाईलमध्ये दुसऱ्या पुरुषासोबतचे नग्न फोटो, बॉयफ्रेंडने केक कापायच्या चाकूनेच तरुणीची हत्या
8
घाईत घेतलेला निर्णय महागात; अमिताभ बच्चन यांनी मुलांच्या ओव्हर कॉन्फिडन्सवर टाकला प्रकाश
9
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पुन्हा पत्रकार परिषद घेणार, महिला पत्रकारांना विशेष आमंत्रण
10
अफगाणिस्तान vs पाकिस्तान; थेट युद्धात कोणाचे सैन्य वरचढ ठरेल? जाणून घ्या...
11
IND vs WI : बुमराहचा 'ट्रिपल फिफ्टी'चा रेकॉर्ड; वेळ घेतला; पण परफेक्ट यॉर्करसह साधला विकेटचा डाव
12
Rajya Sabha Election: भाजपने मुस्लीम नेत्याला उतरवले निवडणुकीच्या रिंगणात, तीन नावाची घोषणा
13
हवाई हल्ल्यानंतर तालिबानचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, १५ सैनिक ठार; अनेक प्रांतांमध्ये गोळीबार
14
IND vs WI : कुलदीपचा 'पंजा'! टीम इंडियानं पाहुण्या वेस्ट इंडिजला दिला फॉलोऑन
15
“ऑपरेशन ब्ल्यू स्टार चुकीच्या पद्धतीने राबवले, इंदिरा गांधींना किंमत मोजावी लागली”: चिदंबरम
16
स्कूल बस चालकाने टेम्पोची काच फोडत धमकी दिली; पुणे पोलिसांनी काही तासातच त्याच ठिकाणी गुडघ्यावर चालवले
17
मृत्यूनंतरही डिजिटल मालमत्तेची चिंता नाही! डिजिलॉकरमध्ये नॉमिनी कसा जोडायचा? जाणून घ्या सोपी प्रक्रिया
18
आधी मिठाई खायली दिली अन् नंतर ३ मुलांचा चिरला गळा; बायको माहेरी जाताच नवरा झाला हैवान
19
थिएटर मध्ये जाऊन "मनाचे श्लोक" चित्रपट बंद पाडणे उज्वला गौड यांना भोवले; गुन्हा दाखल
20
“वेळ पडल्यास लढायची तयारी, आम्ही घाबरत नाही”; १०० टक्के ट्रम्प टॅरिफवर चीनचे चोख प्रत्युत्तर

तुम्हाला कुणी नग्न फोटो मागितले तर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 09:36 IST

अक्षय कुमारसारखा लोकप्रिय चेहरा जेव्हा हा विषय उघडपणे बोलतो, तेव्हा समाजाने लाज नव्हे तर सजगता दाखवावी. सेक्सटॉर्शनचा प्रतिकार पोलिसांपेक्षा आधी समाजाने आणि कुटुंबाने करायला हवा.

ॲड. (डॉ.) प्रशांत माळी, सायबर आणि प्रायव्हसी कायदा तज्ज्ञ

अलीकडे अभिनेता अक्षय कुमार यांनी एका मुलाखतीत उघड केले की, एका गेमिंग ॲपवर त्यांच्या मुलीला ‘न्यूड फोटो’ पाठवण्याची मागणी करण्यात आली होती. समाजमाध्यमांवर ही बातमी काही काळ ट्रेण्ड झाली; पण काही तासांतच गायबही झाली. कारण, ‘सेक्सटॉर्शन’ हा एक असा सायबर गुन्हा आहे, ज्याबद्दल आपण बोलायलादेखील लाजतो. अक्षय कुमारसारखा लोकप्रिय चेहरा जेव्हा हा विषय उघडपणे बोलतो, तेव्हा समाजाने लाज नव्हे तर सजगता दाखवावी. सेक्सटॉर्शनचा प्रतिकार पोलिसांपेक्षा आधी समाजाने आणि कुटुंबाने करायला हवा.

सेक्सटॉर्शन म्हणजे काय?‘सेक्स’ आणि ‘एक्सटॉर्शन’ या दोन शब्दांपासून तयार झालेला ‘सेक्सटॉर्शन’ हा गुन्हा म्हणजे लैंगिक स्वरूपाच्या प्रतिमा, व्हिडिओ किंवा चॅट्स वापरून ब्लॅकमेल करणे होय. गुन्हेगार प्रथम विश्वास संपादन करतात. ते गेमिंग ॲप्स, सोशल मीडिया किंवा व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधतात. नंतर फोटो किंवा व्हिडिओ मिळवतात आणि धमकी देतात ‘हे व्हायरल करू, तुझ्या नातेवाइकांना पाठवू.’ काहीवेळा ते परदेशी असतात, व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करून पैसे मागतात. पीडित व्यक्ती भीतीपोटी गप्प राहते आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करते.

तुमची भीती, गुन्हेगारांची शक्तीभारतीय समाजात लैंगिकता अजूनही झाकली जाते. त्यामुळे सेक्सटॉर्शनचे बळी बहुतेक वेळा तक्रार करायलाच तयार होत नाहीत. मुलं पालकांना सांगत नाहीत, कारण लोक काय म्हणतील? याची त्यांना भीती वाटते. हीच भीती गुन्हेगारांना हवी असते. म्हणून पालकांनी मुलांशी डिजिटल जगावर मोकळेपणाने चर्चा करावी. ऑनलाइन कोणाशी बोलायचं?, काय शेअर करायचं नाही? फोटो पाठवण्याची विनंती आली तर काय करायचं? हे सगळं शिकवणं, ही आजची खरी पालकत्वाची जबाबदारी आहे.

सध्याच्या कायद्यानुसार शिक्षेसाठी काय तरतूद?भारतात सध्या सेक्सटॉर्शनसाठी स्वतंत्र कलम नाही. अनेक कायद्यांखाली हा गुन्हा गंभीर मानला जातो.आयटी कायदा २०००च्या कलम ६७ आणि ६७अ नुसार अश्लील किंवा लैंगिक स्वरूपाचे साहित्य प्रसारित करणे गुन्हा आहे.बीएनएस कलम ७८ (पाठलाग करून छळ करणे/त्रास देणे)देखील लागू होऊ शकते.जर पीडित अल्पवयीन असेल तर पॉक्सो कायद्यांतर्गत अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा ठरतो.

सामाजिक, वैयक्तिक पातळीवरील उपायपालक आणि शिक्षकांनी मुलांना डिजिटल मर्यादा शिकवाव्यात.फोटो किंवा व्हिडीओ शेअर करण्याआधी विचार करा.ऑनलाइन गेमिंग ॲप्सवरील फ्रेंड रिक्वेस्ट मर्यादित ठेवा.कठीण प्रसंग आलाच तर लगेच स्क्रीनशॉट घेऊन सायबर पोलिसांना द्या.सोशल मीडियावर ब्लॅकमेल करणारे खाते ब्लॉक व रिपोर्ट करा. 

English
हिंदी सारांश
Web Title : Demanded Nude Photos Online? Understand Sextortion, Laws, and Protective Measures.

Web Summary : Sextortion involves blackmail using sexual images. Awareness is key; parents should educate children about online safety. Report incidents to cyber police immediately. Current laws address online obscenity, stalking and child exploitation.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAkshay Kumarअक्षय कुमार