उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 11:32 IST2025-09-20T11:24:48+5:302025-09-20T11:32:11+5:30

जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला.

What happened in Udhampur? A soldier was martyred while fighting terrorists, a major operation by security forces | उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई

उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई

जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला. या भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली होती, त्याच वेळी दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार केला. या हल्ल्यात जवान गंभीर जखमी झाला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात तणाव वाढला असून, दहशतवाद्यांना शोधण्यासाठी लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे विशेष ऑपरेशन ग्रुप यांनी संयुक्तपणे मोठी कारवाई सुरू केली आहे.

उधमपूरच्या दुडू-बसंतगड भागात आणि दोडाच्या भदरवाह येथील सेओज धार वन सीमेवर शुक्रवारी संध्याकाळपासून ही शोध मोहीम सुरू आहे. गुप्तचर माहितीनुसार, या भागात दोन ते तीन जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय आहे. या दहशतवाद्यांनी अनेकदा घुसखोरीचा प्रयत्न केला होता, मात्र सुरक्षा दलांनी तो हाणून पाडला होता.

चकमकीनंतर संपूर्ण परिसराला घेराव घालण्यात आला आहे. रात्रभर नाकाबंदी कायम होती आणि शनिवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली. ड्रोन आणि श्वान पथकांच्या मदतीने जंगलातील प्रत्येक कोपरा तपासला जात आहे. याव्यतिरिक्त, किश्तवाडमध्येही दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे, जिथे दहशतवाद्यांचा शोध अद्याप सुरू आहे. श्रीनगर आणि खोऱ्यातील इतर आठ ठिकाणीही पोलिसांनी शोध मोहीम राबवली आहे.

सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना लवकरच पकडण्याचा निर्धार केला आहे. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.

Web Title: What happened in Udhampur? A soldier was martyred while fighting terrorists, a major operation by security forces

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.