शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

न्यायाधीशांसमोर हात जोडून उभे होते राम रहीम, निकाल ऐकताच डोळ्यात आलं पाणी; वाचा काय झालं कोर्टात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2017 17:15 IST

दुपारी बरोबर 2 वाजता राम रहीम हे मागच्या दरवाजाने कोर्ट रूममध्ये दाखल झाले. त्यावेळी कोर्टात डेरा प्रमुखांचे वकील एस.के गर्ग यांच्याशिवाय हरियाणाच्या डीजीपींसह अनेक पोलीस आणि सैन्याचे अधिकारी उपस्थीत होते.

ठळक मुद्देदुपारी बरोबर 2 वाजता राम रहीम हे मागच्या दरवाजाने कोर्ट रूममध्ये दाखल झाले. त्यावेळी कोर्टात डेरा प्रमुखांचे वकील एस.के गर्ग यांच्याशिवाय हरियाणाच्या डीजीपींसह अनेक पोलीस आणि सैन्याचे अधिकारी उपस्थीत होते.गुरमीत राम रहीम न्यायाधिशांसमोर हात जोडून उभे होते.  सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश जगदीप सिंह यांनी 2 वाजून 48 मिनिटांनी निकाल वाचायला सुरूवात केली.  

चंदीगड, दि. 25 - डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम यांना साध्वी बलात्कारप्रकरणी विशेष सीबीआय कोर्टाने आज दोषी ठरवलं आहे. 15 वर्षांपूर्वीच्या या प्रकरणावर  त्यांना सोमवारी 28 ऑगस्ट रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. पंचकुला सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश जगदीप सिंह यांनी आज हा निकाल दिला. या प्रकरणात त्यांना सात ते दहा वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  निकालानंतर बाबा राम रहीम यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अंबाला येथील तुरूंगात त्यांची रवानगी होणार आहे. काय झालं कोर्टात -दुपारी बरोबर 2 वाजता राम रहीम हे मागच्या दरवाजाने कोर्ट रूममध्ये दाखल झाले. त्यावेळी कोर्टात डेरा प्रमुखांचे वकील एस.के गर्ग यांच्याशिवाय हरियाणाच्या डीजीपींसह अनेक पोलीस आणि सैन्याचे अधिकारी उपस्थीत होते. गुरमीत राम रहीम न्यायाधिशांसमोर हात जोडून उभे होते. सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश जगदीप सिंह यांनी 2 वाजून 48 मिनिटांनी निकाल वाचायला सुरूवात केली.  या बहुचर्चित प्रकरणात 3 वाजता न्यायालयाने निर्णय देताना हे गंभीर प्रकरण असून रहीम यांना दोषी ठरवण्यात येत असल्याचं सांगितलं. निर्णय ऐकून राम रहीम यांच्या डोळ्यात पाणी साचलं होतं. जवळपास सात ते 10 मिनिट ते स्तब्ध होते.  निर्णय जाहीर केल्यानंतर पोलिसांनी राम रहीम यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांना अंबाला येथील तुरूंगात नेण्याची तयारी सुरू झाली. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून रहीम यांना लपून कोर्ट परिसराच्या बाहेर नेण्यात आलं. पहिले त्यांना वैद्यकीय चाचणीसाठी रूग्णालयात नेण्यात आलं आणि त्यानंतर त्यांना चोख सुरक्षा व्यवस्थेत अंबाला नेण्यात आलं. त्यापुर्वी कोर्टाने निकाल देण्याआधी कोर्ट परिसराचं अक्षरशः छावणीत रूपांतर झालं होतं. कोर्ट परिसरात फोन घेऊन नेण्यास बंदी घालण्यात आली होती.  कोण आहे बाबा गुरमीत राम रहीम- 15 ऑगस्ट 1967 रोजी बाबा गुरमीत राम रहीम यांचा जन्म झाला. राजस्थानच्या  श्रीगंगानगर जिल्ह्यातील गुरुसर मोदिया येथे एका शीख कुटुंबात ते जन्माला आले. वयाच्या सातव्या 31 मार्च, 1974 रोजी तत्कालीन डेरा प्रमुख शाह सतनाम सिंह यांनी राम रहीम असं त्यांचं नाव ठेवलं. 23 सितंबर, 1990 रोजी शाह सतनाम सिंह यांनी देशभरातील अनुयायांचं सत्संग बोलावलं आणि गुरमीत राम रहीम सिंह यांना आपला उत्तराधिकारी घोषीत केलं. राम रहीम यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. त्यांनी दोन मुलींशिवाय हनीप्रीत हिला दत्तक घेतलं आहे. आले छावणीचे रूप -सिरसा, चंदिगढ व पंचकुला या भागांना लष्करी छावण्यांचे रूप आले आहे. दोन्ही राज्यांच्या सर्व जिल्हाधिका-यांना जिल्ह्याबाहेर न जाण्याचे आदेश दिले गेले आहेत. त्यांनी प्रसंगी १४४ कलम लागू करावे, अशाही सूचना आहेत.  या दोन्ही राज्यांत सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त असून, राखीव सशस्त्र पोलीस दलेही तैनात करण्यात आली आहेत. तेथे प्रसंगी लष्कराला पाठवण्याची तयारीही केंद्राने ठेवली आहे. मात्र केंद्राकडून पुरेशी कुमक मिळाली नसल्याची तक्रार पंजाब सरकारने केली आहे. चंदिगढमध्ये येणा-या वाहनांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. डेरा सच्च सौदाचा मुख्य आश्रम सिरसा येथे असून, तेथे गुरुवारीच १४४ कलम जारी करून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. चंदिगढहून २५0 किलोमीटरवर असलेल्या सिरसामध्ये आतापर्यंत राम रहीम यांचे एक लाखाहून अधिक अनुयायी जमले आहेत.  

टॅग्स :Crimeगुन्हाCBIगुन्हा अन्वेषण विभागPoliceपोलिस