विरोधकांच्या लंच टेबलवर काय घडले? नितीशकुमार हाेणार यूपीएचे संयोजक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 10:17 IST2023-04-13T10:16:42+5:302023-04-13T10:17:19+5:30
राजधानीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षांची बैठक पार पडलेल्या बैठकीत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार व उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव उपस्थित होते.

विरोधकांच्या लंच टेबलवर काय घडले? नितीशकुमार हाेणार यूपीएचे संयोजक
आदेश रावल
नवी दिल्ली :
राजधानीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षांची बैठक पार पडलेल्या बैठकीत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार व उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव उपस्थित होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनीही या बैठकीत सहभाग घेतला.
खरगे यांच्या घरी लंच घेताना या नेत्यांनी मोदींना घेरण्याची रणनीती आखली. विरोधी पक्षांची दिल्लीतील ही पहिली औपचारिक बैठक होती. या महिन्याच्या अखेरीस सर्व विरोधी पक्षांची बैठक बोलावण्यात येणार आहे व नितीशकुमार यांना यूपीएचे संयोजक करण्यात येईल, असे यावेळी ठरले. काही पक्षांचे काँग्रेसबरोबर फारसे जमत नाही. काँग्रेसबरोबर येऊ इच्छित नसलेल्यांना नितीशकुमार यूपीएच्या संयोजकाच्या रूपात एकत्र आणण्याचा प्रयत्न करतील. विरोधी पक्षांच्या बैठकीबरोबरच दिल्लीच्या रामलीला मैदानावर मोठी रॅली घेण्याचीही तयारी केली जात आहे.