शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

हातात हात आणि पायात पाय, महाआघाडीचे भविष्य काय?

By बाळकृष्ण परब | Published: January 21, 2019 3:21 PM

या आघाडीने एकजूट दाखवून सरकार स्थापन केले, तरी ते देशाच्या राजकारणाला 90 च्या दशकाप्रमाणे राजकीय अस्थिरतेकडे घेऊन जाण्याचीच शक्यता अधिक आहे. कारण, आज हातात हात घेतलेले हे नेते एकमेकांच्या पायात पाय घालायलाही मागे-पुढे पाहत नाहीत, हे जनतेनं अनेकदा पाहिलंय. 

ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाला मात देण्यासाठी देशभरातील सर्वच विरोधी पक्ष कंबर कसून तयारीस लागले आहेतमात्र परस्पर विरोधी विचार आणि अति महत्त्वाकांक्षा असलेली राजकीय पक्षांची ही महाआघाडी खरोखरच मोदींना आव्हान देऊ शकेल हा कळीचा प्रश्नकाँग्रेसचे नेते महाआघाडीबाबत फार आशावादी आहेत. पण काँग्रेसला जवळ घ्यायचे नाही आणि दूरही लोटायचे नाही अशी चमत्कारिक नीती महाआघाडीतील पक्षांनी अवलंबली आहे

- बाळकृष्ण परब

आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाला मात देण्यासाठी देशभरातील सर्वच विरोधी पक्ष कंबर कसून तयारीस लागले आहेत. मोदीविरोधी मतांचे विभाजन होऊ नये म्हणून व्यापक महाआघाडीचा घाट घालण्यात आला आहे. शनिवारी पश्चिम बंगालमध्ये एक विराट जनसभा घेऊन विरोधी पक्षांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. देशभरातील प्रमुख 22 विरोधी पक्षांचे चाळीसहून अधिक नेते या सभेला उपस्थित होते. या सभेमधून प्रत्येक नेत्याने मोदी आणि भाजपाविरोधातील आवाज बुलंद केला. शेवटी हातात हात गुंफून ऐक्याची पारंपरिक पोझ देत 'हम सब एक है" हा संदेशही तिथे उपस्थित असलेल्यांसह  देशभरातील जनतेला दिला. मात्र एकजुटीने होणाऱ्या सभा वगळता विरोधी पक्षांमध्ये खरोखरच ऐक्य आहे का? आणि परस्पर विरोधी विचार आणि अति महत्त्वाकांक्षा असलेली राजकीय पक्षांची ही महाआघाडी खरोखरच मोदींना आव्हान देऊ शकेल हा कळीचा प्रश्न आहे.त्याचे कारणही तसेच आहे. भाजपाला देशव्यापी आव्हान देऊ शकेल असा एकमेव विरोधी पक्ष म्हणजे काँग्रेस. त्यामुळे जर नरेंद्र मोदी आणि भाजपाला रोखायचे असेल तर काँग्रेसचा पुढाकार महत्त्वाचा आहे. पण सध्या स्वबळावर मोदी आणि भाजपाला आव्हान देण्याची ताकद या पक्षात नाही. त्यामुळे काँग्रेसचे नेते महाआघाडीबाबत फार आशावादी आहेत. पण काँग्रेसला जवळ घ्यायचे नाही आणि दूरही लोटायचे नाही अशी चमत्कारिक नीती महाआघाडीतील पक्षांनी अवलंबली आहे. उत्तर प्रदेशात आकारास आलेल्या सपा-बसपा आघाडीतून अखिलेश आणि मायावतींनी काँग्रेसला हळुवारपणे बाजूला केले. तर आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेसला जागा सोडण्याबाबत चंद्राबाबू नायडू नन्नाचा पाढा वाचत आहेत. बिहारमध्येही रालोआ विरोधात महा आघाडी करताना काँग्रेसला जास्त जागा सोडण्यास लालूंचा पक्ष तयार नाही. बंगालमध्येही तीच परिस्थिती आहे. महाराष्ट्रात शरद पवार यांनी जागावाटपात आग्रही भूमिका घेत काँग्रेसला नमते घेण्यास भाग पाडलेले आहे. त्यामुळे गरज असेल तरच आघाडी करायची अन्यथा काँग्रेसला दूर ठेवायचे असे या पक्षांचे धोरण आहे. दुसरी गोष्ट म्हणजे 2019 च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसला स्वतःचा पंतप्रधानपदाचा उमेदवार पुढे रेटण्याइतपत जागा मिळणार नाहीत याची खात्री बहुतेक विरोधी पक्षांना आहे. त्यामुळे निकालांनंतर कुठल्याही पक्षाला बहुमत नसले तर जागा कितीही असल्या तरी पंतप्रधानपदासाठी वापर सहमतीचा उमेदवार म्हणून आपापले घोडे पुढे दामटता येईल. तसेच मोदी आणि भाजपा सत्तेत नको म्हणून काँग्रेसही अनिच्छेने का होईना त्याला पाठिंबा देईल, अशी खात्री या मंडळीला आहे.खरंतर मोदीविरोध हा एक समान धागा सोडला तर या आघाडीमध्ये समान अशी कोणतीही बाब नाही. त्यांच्या राजकीय भूमिकांमध्ये परस्परविरोध ठासून भरलेला आहे. उदाहरणच द्यायचं तर आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांचं देता येईल. काही वर्षांपूर्वी राजकारण स्वच्छ करण्यासाठी निघालेल्या केजरीवाल यांनी देशातील बेईमान नेत्यांची यादी प्रसिद्ध केली होती. पण तेच केजरीवाल हे परवाच्या महासभेमध्ये त्याच नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसले होते. देशात मोदीविरोधी पक्ष अनेक असले तरी त्यांच्यात राजकीय एकवाक्यता होणेही अशक्य कोटीतील बाब आहे. उदाहरणच द्यायचं तर ममता बॅनर्जी आणि डावे पक्ष यांच्यात मोदी आणि भाजपाच्या विचारसरणीला विरोध हा समान धागा आहे. पण हे दोन्ही पक्ष बंगालमध्ये एकमेकांचे प्रमुख विरोधी पक्ष आहेत. त्यामुळे त्यांच्यात जागावाटप कसे होणार. तीच बाब काँग्रेस आणि डाव्यांची या पक्षांमध्ये काही मुद्द्यांवर एकमत असले तरी ते केरळमध्ये एकमेकांचे विरोधी पक्ष आहेत. तीच बाब मनसेची महाराष्ट्रात मोदीविरोधात तीव्र भूमिका घेणारी मनसे महाआघाडीत गेली तर सपा, बसपा, राजद अशा पक्षांसोबत वैचारिक ऐक्य होऊ शकते का? तर त्याचे उत्तर नाही, असेच असेल.  त्यामुळे मोदीविरोधात कागदावर भक्कम आणि सभांमध्ये एकजूट दाखवणारी ही महाआघाडी प्रत्यक्ष निवडणुकीच्या रणांगणात कितपत सक्षम ठरेल याबाबत शंकाच आहे. तसेच कदाचित त्रिशंकू निकाल लागल्यानंतर या आघाडीने एकजूट दाखवून सरकार स्थापन केले, तरी ते देशाच्या राजकारणाला 90 च्या दशकाप्रमाणे राजकीय अस्थिरतेकडे घेऊन जाण्याचीच शक्यता अधिक आहे. कारण, आज हातात हात घेतलेले हे नेते एकमेकांच्या पायात पाय घालायलाही मागे-पुढे पाहत नाहीत, हे जनतेनं अनेकदा पाहिलंय. 

टॅग्स :PoliticsराजकारणNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसMamata Banerjeeममता बॅनर्जीSharad Pawarशरद पवारArvind Kejriwalअरविंद केजरीवाल