काय खाता, पिण्याचं पाणी येत का, घराची स्थिती काय? जनगणनेसाठी सरकारचे ३३ प्रश्न; लिव-इन रिलेशनशिमध्ये राहणाऱ्यांना...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 18:15 IST2026-03-30T18:13:19+5:302026-03-30T18:15:34+5:30

Census Questionnaire 2026: १ एप्रिलपासून देशात पहिली डिजिटल जनगणना सुरू होत आहे. या जनगणनेसाठी ३३ प्रश्नांची प्रश्नावली तयार करण्यात आली आहे. यात घराच्या छतापासून ते तुम्ही काय खाता? अशा प्रश्नांचाही समावेश आहे.

What do you eat, is there drinking water, what is the condition of your house? Government's 33 questions for the census; Those in live-in relationships will be considered married | काय खाता, पिण्याचं पाणी येत का, घराची स्थिती काय? जनगणनेसाठी सरकारचे ३३ प्रश्न; लिव-इन रिलेशनशिमध्ये राहणाऱ्यांना...

काय खाता, पिण्याचं पाणी येत का, घराची स्थिती काय? जनगणनेसाठी सरकारचे ३३ प्रश्न; लिव-इन रिलेशनशिमध्ये राहणाऱ्यांना...

देशात अखेर जनगणनेला सुरूवात होत आहे. १ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या या जनगणनेत इत्थंभूत माहिती जमा करण्यासाठी तब्बल ३३ प्रश्नांची प्रश्नावली तयार करण्यात आली आहे. पहिल्यांदाच डिजिटल जनगणना होत असून, यात लोकांना त्यांच्या घराची सगळी माहिती, तसेच जेवणातील मुख्य धान्य, पाणी मिळत का? दुचाकी, चारचाकी आहे का, यासह इतर प्रश्नांचाही समावेश आहे. या जनगणनेत पहिल्यांदाच लोकांना स्वतःची माहिती स्वतः भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 

प्रदीर्घ काळानंतर देशात जनगणनेला सुरूवात होत आहे. डिजिटल जनगणनेसाठी ३३ प्रश्नांचा समावेश असलेली एक प्रश्नावली तयार केली गेली आहे. महत्त्वाचं म्हणजे या जनगणनेत कोणी लिव इन रिलेशिपमध्ये राहत असेल तर त्यांना विवाहितच गृहित धरले जाणार आहे. 

लिव-इन जोडपीही विवाहित समजली जाणार

स्वंय गणना पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार, जर दोन व्यक्ती लिव इन रिलेशनशिपमध्ये राहत असतील आणि ते त्यांचे संबंध स्थिर समजत असतील, तर जनगणनेमध्ये त्यांना विवाहित जोडपे म्हणूनच गृहित धरले जाणार आहे. 

तुम्ही स्वतःच भरु शकता माहिती

ज्या लोकांना स्वतःची, कुटुंबाची माहिती स्वतःच भरायची आहे, अशांसाठी सरकारने सेल्फ एन्युमरेशन हा प्रकल्प उपलब्ध करून दिला आहे. ही सेवा जनगणनेच्या दोन्ही टप्प्यांमध्ये उपलब्ध असणार आहे. १ एप्रिल २०२६ पासून पहिल्या टप्प्यातील जनगणनेला सुरूवात होणार आहे. या काळात घरोघरी जाऊन माहिती संकलित केली जाणार आहे. 

घराबद्दल कोणती माहिती विचारली जाणार? 

रस्ता क्रमांक
इमारत क्रमांक 
जनगणना इमारत क्रमांक
घरात फरशी बसवली आहे का, कोणते साहित्य वापरले गेले आहे?
भिंत बांधण्यासाठी कोणते साहित्य वापरले गेले आहे?
छत बांधण्यासाठी कोणते साहित्य वापरले गेले आहे?
घराचा वापर कशासाठी केला जातो, राहण्यासाठी, दुकानासाठी की इतर दुसऱ्या कारणासाठी?
घराची सध्याची अवस्था कशी आहे, चांगले आहे, साधारण आहे की, खराब?

कुटुंबाबद्दल कोणती माहिती द्यावी लागणार?

कुटुंबातील एकूण सदस्यांची संख्या?
कुटुंबप्रमुखाचे नाव, पुरुष की स्त्री?
कुटुंबप्रमुख कोणत्या प्रवर्गातील आहे?
घर स्वतःचे आहे की, भाड्याने घेतलेले आहे?
घरातील खोल्यांची संख्या?
घरातील एकूण विवाहित जोडप्यांची संख्या?
घरात उपलब्ध असलेल्या सुविधा?
पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्त्रोत काय?
पिण्याचे पाणी उपलब्ध असते का?
शौचालयाची सुविधा आहे का?
शौचालयाचा प्रकार कोणता आहे?
सांडपाण्याचा निचरा होतो का?
घरात स्नानगृह आहे का?
स्वयंपाकघर, एलपीजी,पीएनजी कनेक्शन आहे का?
जेवण बनवण्यासाठी कोणते इंधन वापरले जाते?
कुटुंबाची संपत्ती?
रेडिओ,ट्रान्झिस्टर, टीव्ही आहे का?
इंटरनेटची सुविधा आहे का?
लॅपटॉप, कम्प्युटर आहे का?
टेलीफोन, मोबाईल, स्मार्टफोन आहे का?
सायकल, स्कूटर, मोटारसायकल, मोपेड आहे का?
कार, जीप, व्हॅन आहे का?
आणि इतर काही प्रश्नांचा समावेश आहे. 

Web Title : जनगणना 2026: सरकार के 33 सवाल, लिव-इन रिश्ते भी शामिल।

Web Summary : भारत की आगामी डिजिटल जनगणना में आवास, सुविधाओं और संपत्ति को कवर करने वाले 33 प्रश्न शामिल हैं। लिव-इन जोड़ों को विवाहित माना जाएगा। नागरिक 1 अप्रैल, 2026 से शुरू होने वाली दो चरणों की प्रक्रिया के दौरान ऑनलाइन स्व-गणना कर सकते हैं। प्रश्नों में निर्माण सामग्री से लेकर घरेलू सामान तक शामिल हैं, जिससे व्यापक डेटा संग्रह सुनिश्चित होता है।

Web Title : Census 2026: Government asks 33 questions, includes live-in relationships.

Web Summary : India's upcoming digital census includes 33 questions covering housing, amenities, and assets. Live-in couples will be considered married. Citizens can self-enumerate online during the two-phase process starting April 1, 2026. Questions range from building materials to household possessions, ensuring comprehensive data collection.