शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

गुजरात दंगलीतील दोन चेहऱ्यांना आता काय वाटते? उत्तरं ऐकून वाटेल आश्चर्य

By यदू जोशी | Updated: November 29, 2022 08:45 IST

कुतुबुद्दिन अन्सारी अन् अशोक मोची

यदु जोशी 

अहमदाबाद : गुजरात दंगलीतील ते दोन चेहरे आठवतात ना? अशोक परमार ऊर्फ अशोक मोची... गुजरातेत २००२ मध्ये झालेल्या धार्मिक दंगलीच्या काळात हा तरुण कडव्या  हिंदुत्वाचा चेहरा बनला होता. त्याचवेळी जीव वाचण्यासाठी हात जोडून दया मागणारा कुतुबुद्दिन अन्सारीही जगभर गेला. या दोघांना आता काय वाटते?.

  एकाला हवे आहे परिवर्तन, दुसरा म्हणतो महागाई कमी करा; सरकार कोणतेही चालेल

अशोक मोची जुन्या अहमदाबाद शहरातील एका फूटपाथवर तीस वर्षांपासून अशोक मोची बूटपॉलिशचे काम करतात. त्यांची दैनावस्था तशीच आहे. मुस्लिमांना मारायला निघालेला हिंदू वीर असे कट्टरवाद्यांनी माझे वर्णन केले. त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. दंगलीत माझा हात नव्हता, असता तर मला अटक झाली नसती का? पण मला दंगेखोरांचे प्रतीक बनविले गेले. त्याचा दहा वर्षे त्रास झाला. धमक्याही आल्या. आता आम्ही सगळे सौहार्दाने राहत आहोत, असे अशोक यांनी ‘लोकमत’ला सांगितले. भाजपचे २५ वर्षांचे सरकार मी गुजरातमध्ये पाहिले, हे सरकार बदलले पाहिजे. भेदभाव, धार्मिकवाद, महागाई, बेरोजगारीचे प्रश्न डोक्यावर असलेल्या गुजरातसाठी तेच उत्तर असेल, असे मतही अशोक यांनी व्यक्त केले. हिंसेने, दुसऱ्या धर्माचा द्वेष करण्याने समाजाचे, आपले अन् देशाचेही कधीच भले होऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.

कुतुबुद्दिन अन्सारी ‘वह एक हादसा था, याद कर के फायदा नही. तेव्हा माझ्या डोळ्यांत पाणी होते, पण त्याचे कधी मी भांडवल केले नाही. आज सगळे गुण्यागोविंदाने राहत आहेत. कोणत्या राजकीय पक्षाला वाईट, चांगले म्हणण्याइतका मी मोठा नाही. सामान्यांमध्ये कोणतीही तेढ नाही. राजकारणी आपली पोळी भाजण्यासाठी धर्मांचा वापर करतात. यावेळी सरकार कोणाचेही येऊ द्या, पण महागाई तेवढी कमी करा, आम्ही महागाईने त्रस्त आहोत, असे कुतुबुद्दिन अन्सारी सांगतात. ते बापूनगर, अहमदाबादमध्ये टेलरिंग काम करून कुटुंबाचा निर्वाह करतात. इतक्या वर्षात आता ते व अशोक मोची हे चांगले मित्र झाले आहेत. एकमेकांशी फोनवर बोलतात, कधीतरी भेटतातही. आम्ही जिगरी दोस्त आहोत; दोन्ही धर्मांनीही कटुता संपविली पाहिजे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Gujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022Crime Newsगुन्हेगारीElectionनिवडणूक