अमित शहा ज्यासाठी प्राण द्यायलाही तयार आहेत, तो अक्साई चीन नेमका आहे तरी काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 08:52 PM2019-08-07T20:52:40+5:302019-08-07T20:53:19+5:30

गृहमंत्री अमित शहा यांनी पीओके आणि अक्साई चीन हे भारताचेच भाग आहेत, असे ठणकावताना त्यांच्यासाठी जीवही द्यायलाही तयार आहोत, असे विधान केले होते. 

What is Akshay China exactly, for which Amit Shah is even willing to die? | अमित शहा ज्यासाठी प्राण द्यायलाही तयार आहेत, तो अक्साई चीन नेमका आहे तरी काय?

अमित शहा ज्यासाठी प्राण द्यायलाही तयार आहेत, तो अक्साई चीन नेमका आहे तरी काय?

Next

नवी दिल्ली -  काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय संसदेने मंजूर केला. दरम्यान, यासंदर्भात लोकसभेत सादर केलेल्या विधेयकावर चर्चा सुरू असताना गृहमंत्री अमित शहा यांनी पीओके आणि अक्साई चीन हे भारताचेच भाग आहेत, असे ठणकावताना त्यांच्यासाठी जीवही द्यायलाही तयार आहोत, असे विधान केले होते. 

अमित शहा म्हणाले की,''जम्मू काश्मीर हा भारताच अतूट भाग आहे. मी जेव्हा जम्मू काश्मीरचा उल्लेख करतो, तेव्हा त्यामध्ये पीओके आणि अक्साई चीनचाही समावेश असतो. काँग्रेस पीओकेला भारताचा भाग मानत नाही काय'' असा सवालही त्यांनी केला. अमित शहा यांनी उल्लेख केलेला अक्साई चीन म्हणजे काश्मीरचा नेमका कुठला भाग हे आता जाणून घेऊया.

 काय आहे अक्साई चीन 

अक्साई चीन हा भाग जम्मू काश्मीरचा एकूण 15 टक्के क्षेत्रफळ व्यापतो. या भागावर चीनने आक्रमण करून कब्जा केलेला आहे. अमित सहा यांनी काल लोकसभेत बोलताना अक्साई चीनसह संपूर्ण जम्मू काश्मीर भारताचा अभिन्न भाग आहे, असे सांगितले. मात्र चीन अस्काई चीन झिजियांग उइगर प्रांतातील स्वायत्त भाग आहे, असा दावा नेहमी करत असतो. 

 अक्साई चीन समुद्र सपाटीपासून सुमारे 5 हजार मीटर उंचावर वसलेल्या सॉल्ट फ्लेटमधील एक विशाल वाळवंट आहे. या प्रदेशाचे क्षेत्रफळ सुमारे 37 हजार 244 चौकिमी आहे. जम्मू काश्मीर राज्यातीली उत्तर पूर्व भागातील या क्षेत्रापैकी मोठा भाग 1950 मध्ये चीनने बळकावला होता. चीनने या भागाला प्रशासकीय दृष्ट्या झिजियांग प्रांतातील काश्गर विभिगातील कार्गिलिक जिल्ह्याचा भाग बनवला आहे.  
 

Web Title: What is Akshay China exactly, for which Amit Shah is even willing to die?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.