शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

पश्चिम बंगालमध्ये भाजप-डावे एकत्र येणार? शुभेंदु अधिकारींच्या वक्तव्याने चर्चांना उधाण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2022 18:34 IST

भाजप आमदार शुभेंदू अधिकारी यांच्या एका विधानामुळे बंगालच्या राजकारणात नवीन चर्चा सुरू झाली आहे.

कोलकाता: पश्चिम बंगालच्या राजकारणात नवीन समीकरण तयार होत आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. बिहारच्या राजकारणात एकेकाळचे कट्टर विरोधक असलेले नितीशकुमार आणि तेजस्वी यादव यांच्याप्रमाणेच बंगालच्या राजकारणात कट्टर विरोधक असलेले भाजप आणि डावे एकत्र येऊन ममता बॅनर्जींविरुद्ध एकत्र लढणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. भाजप आमदार शुभेंदू अधिकारी यांच्या एका विधानामुळे बंगालच्या राजकारणात नवीन चर्चा सुरू झाली आहे. 

डाव्यांना सोबत येण्याचे आवाहन विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांनी डाव्यांना नबन मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, 13 सप्टेंबरला जे घडणार आहे, ते बंगालमध्ये 75 वर्षांत कोणीही पाहिले नाही. CBI मुख्यालयामध्ये जाण्यात काही अर्थ नाही, तुम्हाला खरोखरच ममता बॅनर्जींचे सरकार पाडायचे असेल तर 13 सप्टेंबरला आमच्यासोबत नबनला भेट द्या.

'चोर धरो, जेल भरो' अशा घोषणा देत शुक्रवारी सीजीओ कॉम्प्लेक्समध्ये डाव्यांनी गोंधळ घातला होता. ईडी-सीबीआयने भ्रष्टाचाराचा योग्य तपास करावा, अटक केलेल्यांना तात्काळ शिक्षा व्हावी आणि नोकरभरती घोटाळ्यात सहभागी असलेल्यांना तत्काळ अटक करण्यात यावी, या मागण्या डाव्यांनी केल्या होत्या. मात्र, डाव्यांच्या सीजीओ मोहिमेबाबत शुभेंदू अधिकारी म्हणाले की, सीजीओ मोहिमेतून काहीही होणार नाही. भ्रष्ट ममता बॅनर्जी सरकार पाडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे भाजपसोबत एकत्रित प्रचार करणे.

डाव्यांनी भाजपचा प्रस्ताव नाकारलाडाव्या नेत्यांनी शुभेंदू अधिकारी यांची ही हाक धुडकावून लावली. सीपीएम नेते सुजन चक्रवर्ती म्हणाले, 'आंदोलन कसे आणि कोणत्या पद्धतीने करायचे हे भाजप नेते ठरवतील का? डाव्यांनी आंदोलनाचा मार्ग दाखवला. विरोधक आता तोच मार्ग अवलंबत आहेत.' डाव्या आघाडीचे अध्यक्ष विमान बोस रॅलीत म्हणाले की, 'सध्याचे सरकार हुकूमशाही पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न करत आहे, ते थांबवले पाहिजे. आम्ही लोकशाहीची हत्या होऊ देणार नाही.' 

 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालBJPभाजपाtmcठाणे महापालिका