शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

आता बंगालबाहेरही मोदींना टक्कर देणार दिदी; पक्षाचं नाव बदलण्यासंदर्भात सुरू आहे रणनीती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2021 17:25 IST

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपने 200 पार जाण्याचे वक्तव्य केले होते. मात्र, ममतांनी आपल्या आक्रमक शैलीत भाजपचे हे स्वप्न धुळीस मिळवले.

नवी दिल्ली - पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत थेट मोदी-शाहंना टक्कर दिल्यानंतर आता ममता बॅनर्जी TMC ला देशव्यापी करण्याच्या कामात लागल्या आहेत. यासंदर्भात पक्षातून TMC नाव बदलण्याचाही सल्ला देण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तर, नावासंदर्भात कामही सुरू झाले आहे. TMC च्या पुढे अथवा मागे, असे काही जोडण्यावर विचार सुरू आहे, ज्यातून संपूर्ण भारताचे दर्शन होईल. याशिवाय, TMC उत्तर प्रदेशातील बसपाचे वरिष्ठ नेते आणि रणनीतीकार सतीश चंद्र मिश्रा यांच्याही संपर्कात आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपने 200 पार जाण्याचे वक्तव्य केले होते. मात्र, ममतांनी आपल्या आक्रमक शैलीत भाजपचे हे स्वप्न धुळीस मिळवले. आता TMC सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ममता बॅनर्जी पुढील वर्षी उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पंजाबमध्ये होणाऱ्या निवडणुकीत आपले उमेदवार उतरवणार आहेत. यासाठी आतापासूनच तयारीही सुरू झाली आहे.

Corona Vaccine : "दुर्दैवाने मोदींनी उशीरा घेतलेल्या निर्णयामुळे आधीच अनेकांना गमवावा लागला जीव"; ममता बॅनर्जींचा घणाघात

काय आहे तयारी? - TMC ने उत्तर प्रदेशात संपर्क साधायलाही सुरुवात केली आहे. जवळपास मृतावस्थेत गेलेल्या बहुजन समाज पार्टी (BSP)चे अनेक नेते त्यांच्या संपर्कात आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मायावतींचे सर्वात जास्त जवळचे सतीश चंद्र मिश्रादेखील त्यांच्या संपर्कात आहेत. मात्र, या राज्यात TMC आपल्या सहकाऱ्याचा शोध घेणार, की एकट्यानेच निवडणूक लढणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मात्र, TMC च्या एका मोठ्या नेत्याने म्हटल्याप्रमाणे, सर्वप्रथम या राज्यांत स्थान निर्माण करण्याला आमचे प्राधान्य असेल. मात्र, असेल असले तरी, सहकाऱ्यासोबत निवडणूल लढून आम्ही सत्ताधारी पक्षाला आव्हान देऊ शकतो, असे आम्हाला जाणवले तर आम्हाला दुसऱ्या पक्षाशी आघाडी करायलाही काहीच अडचण नाही.'

ममता थांबेनात! बंगालच्या बाहेर मोदींना धक्का देण्याची तयारी; चाणक्याला लावले कामाला

किमान उत्तराखंड आणि उत्तरप्रदेश या दोन राज्यांत भाजपला आव्हान देण्यासाठी भाजपच्याच नीतीचा अवलंब करण्याची तयारी सुरू आहे. म्हणजेच, भाजपतील असंतुष्ट नेत्यांशी संपर्क साधून त्यांना आपल्या पक्षात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता तृणमूल काँग्रेस बंगालमधून बाहेर पडत देशाच्या इतर राज्यांत जाण्याच्या आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीत देशात आपले उमेदवार उभे करण्याच्या तयारीला लागली आहे. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाTrinamool Congressतृणमूल काँग्रेस