शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
3
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
4
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
5
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
6
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
7
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
8
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
9
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
11
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
13
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
14
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
15
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
16
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
17
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
18
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
19
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
20
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश

आता केवळ 71 दिवस! ममतांची खुर्ची वाचविण्यासाठी TMCनं पुन्हा ठोठावला निवडणूक आयोगाचा दरवाजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 19:47 IST

ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने सलग तिसऱ्यांदा बंगालमध्ये पूर्ण बहुमत मिळविले आहे. मात्र, त्या स्वतः नंदीग्राम सीटवर भाजप नेते आणि त्यांचे माजी सहकारी शुभेंदू अधिकारी यांच्याकडून पराभूत झाल्या आहेत.

कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये प्रचंड बहुमताने सत्तेवर आलेल्या ममता बॅनर्जी यांच्यासाठी खुर्चीची चिंता अद्यापही कायम आहे. ममता पुढील 71 दिवसांत आमदार झाल्या नाही, तर त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. यामुळे तृणमूल काँग्रेसने आज पुन्हा एकदा निवडणूक आयोगाकडे जाऊन राज्यात लवकरात लवकर पोटनिवडणूक घ्यावी, अशी मागणी केली आहे. ममता बॅनर्जी यांना मुख्यमंत्री पदावर कायम राहण्यासाठी 5 नोव्हेंबरपर्यंत विधानसभा सदस्य होणे आवश्यक आहे.

टीएमसी नेत्या सौगत रॉय यांच्या नेतृत्वाखाली टीएमसीच्या शिष्टमंडळाने आज निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन राज्यात लवकरात लवकर पोटनिवडणूक घेण्यात याव्यात, अशी मागणी केली आहे. यापूर्वीही यासंदर्भात दोन वेळा टीएमसीने अर्ज केला आहे. एवढेच नाही, तर खुद्द मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही, राज्यात लवकरात लवकर पोटनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी केली आहे. सौगात रॉय म्हणाले, की "पश्चिम बंगालमधील सातही जागांसाठी लवकरात लवकर पोटनिवडणूक घेण्यात यावी, असे निवेदन आम्ही निवडणूक आयोगाला दिले आहे."

ममता बॅनर्जींना धक्का, आता सीबीआय करणार 'या' प्रकरणाचा तपास

ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने सलग तिसऱ्यांदा बंगालमध्ये पूर्ण बहुमत मिळविले आहे. मात्र, त्या स्वतः नंदीग्राम सीटवर भाजप नेते आणि त्यांचे माजी सहकारी शुभेंदू अधिकारी यांच्याकडून पराभूत झाल्या. नियमा प्रमाणे, जी व्यक्ती विधानसभा किंवा विधान परिषदेची (ज्या राज्यांत विधान परिषद आहे अशा राज्यांत) सदस्य नाही, तिला मुख्यमंत्री अथवा मंत्री बनविले जाऊ शकते. मात्र, अशा व्यक्तीला सहा महिन्यांच्या आत निवडून येणे आवश्यक आहे.

या जागांवर होणार आहे पोटनिवडणूक -पश्चिम बंगालमधील भवानीपूर, दिनहाटा, सुती, संतीपूर, समशेरगंज, खर्दाह आणि जंगीपूर विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. मृत्यू अथवा राजीनाम्यांमुळे या जागा रिक्त झाल्या आहेत. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीTrinamool Congressतृणमूल काँग्रेसElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगElectionनिवडणूकwest bengalपश्चिम बंगाल