प.बंगालच्या राज्यपालांनी घेतली अमित शहांची भेट; भाजपाकडून राष्ट्रपती शासन लागू करण्याची मागणी? 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 03:00 PM2019-06-10T15:00:12+5:302019-06-10T15:03:07+5:30

पश्चिम बंगालचे राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली.

West Bengal tense: Governor Keshari Nath Tripathi calls on PM Modi, Amit Shah as violence intensifies; BJP observes ‘black day’ | प.बंगालच्या राज्यपालांनी घेतली अमित शहांची भेट; भाजपाकडून राष्ट्रपती शासन लागू करण्याची मागणी? 

प.बंगालच्या राज्यपालांनी घेतली अमित शहांची भेट; भाजपाकडून राष्ट्रपती शासन लागू करण्याची मागणी? 

Next

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती शासन लागू करण्याची मागणी भाजपा करण्याची शक्यता आहे. भाजपाचेपश्चिम बंगालमधील प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांनी सांगितते की, 'राज्यातील परिस्थिती नियंत्रणात नाही आहे. त्यामुळे भाजपा राष्ट्रपती शासन लागू करण्याची मागणी करु शकते. तसेच, भाजपाची वैचारिक भूमिका राष्ट्रपती शासन विरोधात आहे. मात्र, राज्यात सरकार चालवण्यास मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पूर्णपणे अयशस्वी ठरल्या आहेत.'

पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या मुद्द्यावरून राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. नरेंद्र मोदी यांच्यानंतर आता केसरीनाथ त्रिपाठी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केली. दरम्यान, गेल्या दोन दिवसांत भाजपाच्या तीन कार्यकर्त्यांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार वाढला आहे. 


आज (10 जून) भाजपाच्यावतीने बशीरहाटसह संपूर्ण बंगालमध्ये 12 तासांचा बंद पुकारण्यात आलेला आहे. भाजपा हा दिवस काळा दिवस म्हणुनही पाळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. भाजपाचे नेता राहुल सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'राज्य सरकारच्या मनमानी विरोधात सोमवारी बशीरहाटमध्ये 12 तासांचा बंद पुकारण्यात आला आहे. तसेच भाजपा संपूर्ण  राज्यात काळा दिवस पाळणार आहे.' 


पश्चिम बंगालमध्ये भाजपा व तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांमधील वाद वाढत आहे. शनिवारी परगना जिल्ह्यामध्ये पार्टीचे झेंडे काढून फेकल्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. या घटनेनंतर तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपाच्या पाच कार्यकर्त्यांची गोळ्या घालून हत्या केली असल्याचा भाजपाकडून दावा करण्यात आला आहे. तर 18 जण बेपत्ता असल्याचेही सांगण्यात आले आहे. तर तृणमूल काँग्रेसनेही त्यांच्या तीन कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आल्याचे म्हटले आहे. 

(भाजपा आज काळा दिवस पाळणार, 12 तास बंदची हाक)

दरम्यान, पश्चिम बंगालच्या कूचबिहारमध्ये तृणमूल काँग्रेसच्या आणखी एका कार्यकर्त्याची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. कुचबिहारमधील पेटला बाजारा परिसरात बुधवारी (5 जून) एका कार्यकर्त्याची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली. अजीजूर रहमान असं हत्या झालेल्या कार्यकर्त्याचं नाव आहे. तसेच भाजपाने ही हत्या केल्याचा गंभीर आरोप तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला होता. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे आमदार सत्यजित बिश्वास यांची काही दिवसांपूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी एफआयआर दाखल केलं असून, दोन आरोपींना अटक केली आहे. तसेच हन्सखली पोलीस स्टेशनचे ठाणेकर यांना निलंबित करण्यात आलं आहे. बिश्वास यांच्या हत्येमुळे पश्चिम बंगालमध्ये खळबळ उडाली आहे. सत्यजीत बिश्वास हे कृष्णगंज मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. नाडिया जिल्ह्यात ही घटना घडली होती. सरस्वती मातेची पूजा सुरू असताना त्यांच्यावर हा गोळीबार करण्यात आल्याची माहिती आहे. त्यांना तात्काळ शक्तिनगर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते. 
 
 

Web Title: West Bengal tense: Governor Keshari Nath Tripathi calls on PM Modi, Amit Shah as violence intensifies; BJP observes ‘black day’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.