शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

West Bengal : भाजपची भीती! पश्चिम बंगालच्या राजकारणात 'भाभीं'ची एंट्री, ...म्हणून ममतांनी सुरू केली 'भावाची' मनधरणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 14:08 IST

ममता बॅनर्जींनी आपल्या वहिनींना फार आनंदाने राजकारणात आणलेले नाही. हा एक मजबुरीचा सौदा आहे.

कोलकाता - ममता बॅनर्जी यांनी आपल्या वहिनींना (भाऊजई) राजकारणात एंट्री दिली आहे. यामुळे अनेक प्रश्नही उपस्थित झाले आणि टीकाही झाली. एवढेच नाही, तर टीएमसीमध्ये 'घराणेशाहीची' मुळं खोलवर रुजत असल्याचेही बोलले जात आहे. पक्षात आधीपासूनच भाच्याचे वर्चस्व आहे आणि आता वहिनीही आल्या आहेत. पण वहिनींना राजकारणात आणण्यामागचे जे कारण सांगितले जात आहे. ते कारण फारच रंजक आहे.

ममता बॅनर्जींनी आपल्या वहिनींना फार आनंदाने राजकारणात आणलेले नाही. हा एक मजबुरीचा सौदा आहे. एकप्रकारे राज्यातील आपली प्रतिष्ठा वाचविण्याचा डाव आहे. ममतांच्या वहिनींचे पती अर्थात ममताचे मोठा बंधू ममतावर बऱ्याच दिवसांपासून नाराज आहेत. त्यांना राजकारणातही स्थान हवे आहे पण ममतांनी त्यांच्यापासून एक विशिष्ट अंतर ठेवले आहे.

भाजपमध्ये प्रवेशासंदर्भातील वृत्त - ममता यांनी आपल्या दुसऱ्या भावाचा मुलगा अभिषेक याला ज्या पद्धतीने राजकारणात प्रमोट केले, ते या 'भाऊ साहेबांना' आवडलेले नाही. यासंदर्भात त्यांनी अनेक वेळा जाहीर नाराजीही व्यक्त केली आहे. दरम्यान, ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्याही येत होत्या.

ममताचा भाऊच सर्वात कमकुवत कडी -विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर ममता बॅनर्जी भाजपला रोखण्यात अथवा संपवण्यात व्यस्त आहेत. ते पाहता भाजपही मोठा धक्का देण्याच्या इराद्यात आहे. पण, तृणमूल काँग्रेसच्या कुण्याही मोठ्या नेत्याला फोडणे सोपे नाही. यामुळे त्यांना ममतांचा 'भाऊ'च सर्वात कमकुवत वाटत आहे.

भावाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न -ममता यांच्या 'भावा'शी संपर्क साधावा, जर त्यांची भाजपमध्ये येण्यासाठी काही अट असेल तर, त्यावरही विचार केला जाऊ शकतो, असे संकेत दिल्लीतून राज्यातील नेत्यांना मिळाले आहेत. ममतांना भाजपच्या या हालचालींची कुणकुण लागताच त्या सतर्क झाल्या आणि त्यांनी भावाची नाराजी दूर करण्यासाठी वहिनींना कोलकाता महानगरपालिकेच्या निवडणुकीत तिकीट देऊन राजकारणात एंट्री करवली.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीPoliticsराजकारणwest bengalपश्चिम बंगालBJPभाजपाTrinamool Congressतृणमूल काँग्रेस